भारताचा तांदुळ मिळेना, अमेरिकेत लोकांचे हाल; IMFची मोदींना 'ही' कळकळीची विनंती

Rice Export Ban: भारत सरकारने तांदूळ निर्यातीवर लावलेल्या बंदीमुळे जगतील लोकांचे हाल होत आहेत, त्यामुळे आयएमएफ संघटनेचे अर्थतज्ञ पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करणार आहेत.
Rice export ban
Rice export banEsakal
Updated on

IMF Economist requested modi:आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ पिअरे ऑलिव्हिअर गौरिंचास (Pierre Olivier Gaurinchas) म्हणाले की आम्ही भारत सरकारला बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी हटवण्याची मागणी करु, कारण याचा परिणाम जगावर होत आहे.

भारताने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी लावल्याने, अमेरिकेसहित जगभारतील अनेक देशांमध्ये गोंधळ निर्माण झाला. हे होणारचं होतं. कारण भारत जगातील शंभराहून अधिक देशांना तांदूळ निर्यात करतो. भारत सरकारच्या या निर्णयानंतर अमेरिकेवर मोठा परिणाम बघायला मिळाला.

अमेरिकेच्या सुपर मार्केट्समध्ये एका बाजूला तांदळाची किंमत गगनाला भिडतीये तर, दुकानाच्या बाहेर ग्राहकांना लांबचं लांब रांगा लावून उभं राहावं लागतंय. मात्र, फक्त अमेरिकाचं नव्हे तर,दुसऱ्या देशांमध्येही अडचणी वाढताना दिसतं आहे.

१६० देशांमध्ये भारताच्या तांदळाची मागणी

नोमुरानुसार, भारतातून निर्यात होणाऱ्या सर्व प्रकारच्या तांदळाची जागतिक बाजारपेठेत ४० टक्के भागीदारी आहे. तसेच, बिगर बासमती तांदळाची भागीदारी २५ टक्के आहे. भारतातून जगातील १६० देशांना तांदूळ निर्यात केला जातो.

अमेरिका, इटली, थायलंड, स्पेन आणि श्रीलंका हे देश भारताच्या तांदळाचे सर्वात मोठे आयातक देश आहे, जे तांदळासाठी पूर्णपणे भारतावर अवलंबून आहेत. त्याचबरोबर सिंगापुर, फिलिपाईन्स, हॉंगकॉंग आणि मलेशिया या देशांचा देखील यात समावेश आहे.

Rice export ban
Sharad Ponkshe: "आरक्षण नसताना..."; पोंक्षेंच्या पोस्टला अंधारेंचं सडेतोड उत्तर; म्हणाल्या, माझं कौतुक...

अमेरिकेमध्ये तांदूळ मिळवण्यासाठी करावा लागतोय संघर्ष

भारत सरकारच्या तांदळावरील निर्यात बंदीच्या निर्णयानंतर अमेरिकेमध्ये परिस्थिती बिघडली आहे. सोशल मिडीयावर काही फोटो व्हायरल होतं आहेत, ज्यातून अमेरिकेतील तांदळासाठी करण्यात येणारा संघर्ष स्पष्ट दिसू शकतो.(Latest Marathi news)

अमेरिकेच्या सुपर मार्केटमध्ये बिगर बासमती तांदूळ खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात येत आहे आणि एक-एक माणूस १०-१० पॅकेट खरेदी करतोय. तसेच तांदळाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, ९ किलोच्या एका पॅकेटची किंमत वाढून २७ डॉलर किंवा २२१५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

Rice export ban
Owaisi on Manipur: मणिपूरमध्ये आता नव्या कट-कारस्थानाला सुरुवात; ओवैसींचा केंद्रावर हल्लाबोल

सरकारने तांदळाच्या निर्यातीवर बंदी का लावली?

सरकारच्या मते, भारतामध्ये तांदशळाच्या किमती वाढत आहेत. रिटेल बाजारपेठेत मागच्या वर्षीच्या तुलनेत ११.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागच्या महिन्यात तांदळाची किंमत ३ टक्क्यांनी वाढली आहे.

त्यामुळे देशातील बाजारपेठेतील तांदळाचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी आणि तांदळाची उपलब्धता निश्चित करण्यासाठी सरकारने मागच्या वर्षी ८ ऑगस्टला बिगर बासमची तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क आकारले होते, त्यानंतर आता सरकारने तांदळाच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी लावली आहे.

Rice export ban
Amit Shah Video : ''DMK सरकार देशातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार'', अमित शाहांचा CM स्टॅलिन यांच्यावर जोरदार हल्ला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.