आइसलँडचे पंतप्रधान महामहिम बजरनी बेनेडिक्ट्सन यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक, आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचं रेक्जाविक इथं स्वागत केलं. २४ जून रोजी या दोघांमध्ये बैठक पार पडली. यावेळी दोघांमध्ये लोकांच्या मानसिक आरोग्याबाबत महत्त्वाची चर्चा पार पडली. (Important discussion between PM of Iceland and Shree Shree Ravi shankar bilateral meeting was held in Reykjavik)
या बैठकीत युरोपमधील सध्याची शांत परिस्थिती, मानसिक आरोग्यावर लक्ष देण्याची गरज आणि सामाजिक समृद्धीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा झाली. यावेळी श्री श्री यांनी 'आर्ट ऑफ लिव्हिंग' या संस्थेबद्दल माहिती दिली. त्यांनी म्हटलं, प्राचीन ध्यान पद्धती आणि श्वासोच्छवासाच्या तंत्रांचा वापर करून, लोकांना तणाव आणि चिंता दूर करण्यास संस्था मदत करते. तसंच इथं संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी काम केलं जातं.
सध्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग' डेन्मार्क इथं 'ब्रेथ स्मार्ट' कार्यक्रमाद्वारे कैदी आणि गुन्हेगारी टोळीतील सदस्यांचं पुनर्वसन करत आहे. यामुळं गुन्हेगारांमधील हिंसाचार आणि अंमलीपदार्थांचे व्यसन दूर करता येणार आहे. यामुळं आंतरिक शांती आणि बंधुभावाची भावना वाढेल, असंही श्री श्री यांनी यावेळी सांगितलं. तसंच हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आइसलँडच्या योगदानाबद्दल पंतप्रधान बेनेडिक्टसन यांची श्री श्री यांनी प्रशंसा केली. आइसलँडचं सुमारे 100 टक्के वीज उत्पादन नूतनीकरणक्षम स्रोतांमधून केलं जातं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.