'रशिया-युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी सर्व देशांनी प्रयत्न करायला हवेत. या युध्दामुळं संपूर्ण जगाला मोठा फटका बसत आहे.'
जेद्दाह : रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia and Ukraine War) सुरू असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळं युक्रेनमधील अनेक प्रमुख शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय.
युक्रेनमधील संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या उद्देशानं सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) जेद्दाह शहरात दोन दिवसीय परिषदेला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल शनिवारी उपस्थित होते. त्यांच्यासह इतर अनेक देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही या परिषदेत सहभागी झाले होते.
सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी या परिषदेचं आयोजन केलं होतं. सुमारे 40 देशांचे उच्च सुरक्षा अधिकारी यात सहभागी झाले होते. यावेळी एनएसए डोवाल यांनी बैठकीत सांगितलं की, भारतानं रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी संघर्षाच्या सुरुवातीपासून सर्वोच्च पातळीवर नियमित चर्चा केली आहे.
भारत युनायटेड नेशन्स चार्टर आणि आंतरराष्ट्रीय कायद्यातील तत्त्वांवर आधारित जागतिक व्यवस्थेचं समर्थन करतो. सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा अपवाद वगळता सर्व राज्यांनी आदर केला पाहिजे. भारत युक्रेनला सर्व प्रकारची मानवतावादी मदत देत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
रशिया-युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी सर्व देशांनी प्रयत्न करायला हवेत. या युध्दामुळं संपूर्ण जगाला मोठा फटका बसत आहे. भारत युक्रेनला मानवतावादी सहाय्य आणि ग्लोबल साउथमधील शेजारी देशांना आर्थिक सहाय्य प्रदान करत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. कायमस्वरूपी आणि सर्वसमावेशक तोडगा काढण्यासाठी भारत सक्रिय आणि इच्छुक भागीदार राहील यावर त्यांनी भर दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.