Omicron चा संसर्ग टाळणं अशक्य! शास्त्रज्ञाचा दावा

ओमिक्रॉनचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाकडून सतर्कतेचा इशारा.
Omicron Virus
Omicron Virusesakal
Updated on

ओमिक्रॉनमुळे (Omicron) सध्या संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. कोरोनाचा (Covid19) विषाणुचा हा व्हेरीअंट सर्वात आधी दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळला होता. या नव्या व्हेरीअंटची माहिती सर्वात आधी दक्षिण अफ्रिकेतील व्हायरोलॉजीस्ट वोल्फगँग प्रीगर यांनी दिली होती. त्यातच आता प्रीगर यांनी स्थानिक माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत, कोविड-19 च्या झपाट्याने वाढणार्‍या प्रकरणांबद्दल तसेच नवीन व्हेरीअंटबद्दल अतिशय आश्चर्यकारक माहिती दिली आहे.

Omicron Virus
चीनचा एक आदेश... फुटबॉलपटूंनी झाकले स्वतःचे अंग

कोरोनाचा नवा व्हेरीअंट अतिशय संसर्गजन्य असून, या व्हेरीअंटचा संसर्ग टाळणे जवळजवळ अशक्य असल्याची माहिती वोल्फगँग प्रीगर यांनी दिली आहे. यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेत लवकरच ओमिक्रॉनची प्रकरणं कमी होतील, असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. त्यांचा हा दावा खरा ठरला असून, दक्षिण अफ्रिकेतील प्रकरणांमध्ये ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येत घट होत आहे. प्रोफेसर वोल्फगँग प्रीगर यांनी सतर्कतेचा इशारा दिला आणि सांगितले की, 'ओमिक्रॉन पूर्वीच्या व्हेरीअंटपेक्षा कमी धोकादायक असला तरी, आम्ही अजूनही ओमिक्रॉनमुळे होणारे मृत्यू पाहतो आहोत.

Omicron Virus
गुगलची न्यू इयर कॅंडी पाहिलीत का? डुडलद्वारे देणार सरत्या वर्षाला निरोप

Omicron टाळणे कठीण

Omicron चा पहिला रुग्ण नोव्हेंबरमध्ये आढळून आला होता. तेव्हापासून जगभरात ओमिक्रॉनची प्रकरणं दुपटीने वाढायला सुरुवात झाली होती. प्राथमिक डेटा सूचित करतो की इतर प्रकारांच्या तुलनेत ओमिक्रॉनमुळे फक्त सौम्य रोग होतो, परंतु शास्त्रज्ञ अजूनही चेतावणी देत ​​आहेत की वाढलेल्या प्रकरणांमुळे आरोग्य यंत्रणेवर दबाव येऊ शकतो. प्रोफेसर वोल्फगँग प्रीगर म्हणाले, 'आतापर्यंत हा सामान्य सर्दी विषाणू असल्याचे सिद्ध झालेले नाही, परंतु चांगली बातमी अशी आहे की तो त्या दिशेने वाटचाल करत आहे. तथापि, वाईट बातमी अशी आहे की अशा प्रकारासह संसर्ग टाळणे अशक्य होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()