तालिबानसाठी PM इम्रान यांची बॅटिंग, म्हणाले 'त्यांना प्रोत्साहित करा'

"बाहेरुन कोणी अफगाण महिलांना त्यांचे अधिकार मिळवून देईल, असा विचार करत असेल, तर ते चुकीचं आहे"
IMRAN KHAN
IMRAN KHANFRANC24
Updated on

लाहोर: सध्या जगभरात तालिबानच्या (Taliban) जुलमी राजवटीची चर्चा सुरु असताना, पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran khan) यांनी तालिबानसाठी जोरदार बॅटिंग केली आहे. अफगाणिस्तानवर (Afganistan) ताबा मिळवणाऱ्या तालिबानबद्दल जागतिक समुदायाचे एकमत घडवण्यासाठी जेणेकरुन त्यांच्या राजवटीला मान्यता मिळावी, यासाठी इम्रान खान जोरदार प्रयत्न करत आहेत.

तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर इम्रान खान यांनी प्रथमच सीएनएन या आंतरराष्ट्रीय वाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत इम्रान खान यांनी "अफगाणिस्तानात शांतता आणि स्थिरतेसाठी तालिबानसोबत चर्चा करणे हा एक चांगला मार्ग आहे. महिला हक्क आणि सर्वसमावेशक सरकारसाठी त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे" असं म्हटलं आहे.

IMRAN KHAN
CM ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर तिरुपती देवस्थानच्या ट्रस्टवर

"संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानचं वर्चस्व आहे. त्यांनी सर्वसमावेशक सरकारच्या दृष्टीने पावल टाकली, सर्व गट एकत्र आले, तर ४० वर्षानंतर अफगाणिस्तानात शांतात निर्माण होऊ शकते. पण जर काही चुकीचं घडलं, ज्याची आपल्या सगळ्यांनाच चिंता आहे, तर मात्र मोठा गोंधळ निर्माण होईल. सर्वात मोठं मानवी संकट निर्माण होईल" असं इम्रान खान म्हणाले. "बाहेरुन कोणी अफगाण महिलांना त्यांचे अधिकार मिळवून देईल, असा विचार करत असेल, तर ते चुकीचं आहे. अफगाण महिला सक्षम आहेत. त्यांना थोडा वेळ द्या. त्यांना त्यांचे अधिकार मिळतील" असे इम्रान खान म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.