Imran Khan PTI Ban : इम्रान खानच्या पक्षावर येणार बंदी, पाकिस्तान सरकारची घोषणा; ज्या कायद्याने मुशर्रफ यांच्यावर फास आवळला त्याच...

Pakistan News : इम्रान खान यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये इम्रान यांच्या पक्षाला निवडणुका लढू दिल्या नव्हत्या. त्यानंतर इम्रान यांच्या समर्थकांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. सर्वात जास्त जागा जिंकूनदेखील इम्रान खान पाकिस्तानमध्ये सरकार बनवू शकले नव्हते.
Imran Khan
T20 World Cup 2024 Imran Khan esakal
Updated on

Imran Khan News : गैरव्यवहारांमुळे अडचणीत सापडलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षावर आता बंदीची कारवाई होणार आहे. तहरीक-ए-इंसाफ या पक्षावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राष्ट्रविरोधी कारवायांच्या आरोपांमुळे इम्रान खान पाकिस्तानच्या जेलमध्ये आहेत.

इम्रान खान यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये इम्रान यांच्या पक्षाला निवडणुका लढू दिल्या नव्हत्या. त्यानंतर इम्रान यांच्या समर्थकांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. सर्वात जास्त जागा जिंकूनदेखील इम्रान खान पाकिस्तानमध्ये सरकार बनवू शकले नव्हते.

Imran Khan
Manoj Jarange : पवार-भुजबळ भेटीवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया; म्हणाले, ते लय बेईमानी...

पाकिस्तानच्या माहिती खात्याचे मंत्री अताउल्लाह तरार यांनी सोमवारी सांगितलं की, पाकिस्तानी सरकारने इम्रान यांच्या पक्षाला बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने आरक्षित जागांच्या प्रकरणात पीटीआयला दिलासा दिला होता. अताउल्लाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, राष्ट्रविरोधी कारवायांमुळे सरकारने पीटीआयवर बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Imran Khan
Pune Murder: जेवण आवडलं नाही म्हणून आचाऱ्याच्या डोक्यात घातला हातोडा! उंड्रीमधील कॅन्टीनमध्ये दिवसाढवळ्या खून

सरकार हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पाठवणार असल्याचं तरार यांनी सांगितलं. इम्रान खान आणि पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आरिफ अल्वी यांच्या विरोधात कलम 6 अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशीही माहिती मंत्र्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तान आणि पीटीआय एकत्र राहू शकत नाहीत. आमच्याकडे या कारवाईच्या बाजूने सबळ पुरावे आहेत. परवेझ मुशर्रफ यांच्यावरही परिशिष्ट ६ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.