पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना अविश्वास प्रस्तावाच्या एक दिवस आधी मोठा धक्का बसला आहे. इम्रान खान यांचे कॅबिनेट मंत्री शाहजहान बुगती यांनी राजीनामा (Cabinet Minister Shahjahan Bugti resigns) दिला आहे.
मात्र, सायंकाळी इम्रान खान यांनी खुर्ची पडण्याची भीती बाळगून रविवारी इस्लामाबादमध्ये मोठी सभा घेतली. या रॅलीतून इम्रान यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला. तसेच राजीनामा देणार नसल्याचे सांगितले आहे. (pakistan pm imran khan said will not resign)
पाकिस्तानच्या संसदेत सोमवारी (ता. २८) इम्रान खान यांच्याविरोधात ठराव मांडण्यात येणार आहे. हा प्रस्ताव शुक्रवारीच मांडण्यात येणार होता. मात्र, सभागृह तहकूब झाल्याने सोमवारी तो मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. ८ मार्च रोजी विरोधकांनी इम्रान खान सरकारविरोधात अविश्वासाच्या प्रस्तावाची नोटीस दिली होती. त्यानंतर पाकिस्तानात राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले होते.
पाकिस्तानात वाढत असलेल्या महागाईला इम्रान खान (Imran Khan) यांचे नेतृत्व जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यामुळे इम्रान खान यांच्या सरकारमधील ५० मंत्री अचानक गायब झाले होते. यानंतर शाहजहान बुगतीने इम्रान खानची (Imran Khan) साथ सोडली आहे. शाहजान बुगती हा बलुचिस्तान चळवळीचा प्रमुख नेता अकबर बुगतीचा नातू आहे. आता इम्रान खान यांनी आपण राजीनामा देणार नसल्याचे सांगितले आहे.
रविवारी इस्लामाबादच्या रॅलीत पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रॅलीत पोहोचलेल्या लोकांचे आभार मानून भाषणाला सुरुवात केली. संकटाच्या वेळी माझ्या एका कॉलवर आल्याबद्दल धन्यवाद... तुम्हाला ज्या प्रकारे आमिष दाखवले होते, पैशाची ऑफर दिली होती, ते मला माहीत आहे, असेही इम्रान खान म्हणाले.
आर्थिक संकट, बेरोजगारीने घेरले
पाकिस्तानच्या संसदेत एकूण ३४२ सदस्य आहेत. कोणत्याही पक्षाला सरकार बनवायचे असेल तर १७२ खासदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. इम्रान खान (Imran Khan) यांच्याकडे केवळ १५० खासदार असल्याचा विरोधकांचा दावा आहे. एकीकडे विरोधकांकडून इम्रान खान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर दुसरीकडे इम्रान खान समर्थकांना संसदेचा घेराव करण्यास सांगत आहेत. इम्रान खान यांनी २०१८ मध्ये नवा पाकिस्तान निर्माण करण्याचा दावा करीत सत्ता हस्तगत केली. मात्र, इम्रान खान यांना आर्थिक संकट आणि बेरोजगारीने घेरले आहे.
पेट्रोलचे दर प्रतिलिटर दहा रुपये कमी केले
जेव्हा आमच्याकडे पैसा आला तेव्हा मी अडीचशे अब्ज सबसिडी देऊन पेट्रोलचे दर प्रतिलिटर दहा रुपये कमी केले आणि विजेचे दर प्रति युनिट पाच रुपये कमी केले. मला खात्री आहे की मी जसजसे पैसे गोळा करीत जाईन तसतसे मी ते सर्व पैसे माझ्या समाजासाठी खर्च करेन, असेही इम्राना खान म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.