इम्रान खान आक्रमक; म्हणाले, मी या चोरांसोबत संसदेत बसणार नाही

Imran Khan said Will not sit in Parliament
Imran Khan said Will not sit in ParliamentImran Khan said Will not sit in Parliament
Updated on

इम्रान खान यांची सत्तेतून हकालपट्टी केल्यानंतर सोमवारी पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. मात्र, इम्रान खान यांचा पक्ष पीटीआय याला विरोध करणार असल्याचे म्हटले आहे. सर्व खासदार राजीनामे देतील आणि नवीन पंतप्रधान निवडीवर बहिष्कार टाकतील, असे इम्रान खान (Imran Khan) म्हणाले. (Imran Khan said Will not sit in Parliament)

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे खासदार नॅशनल संसदेचा राजीनामा देतील आणि स्वातंत्र्यासाठी लढतील, असे यापूर्वी इम्रान खानचे सहकारी फवाद चौधरी म्हणाले होते. इम्रान खानसह पीटीआयच्या सदस्यांनी सामूहिक राजीनामा (MPs will resign) देण्याचा आणि पंतप्रधानपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत संसदेत बसणार नाही. मी या चोरांसोबत संसदेत बसणार (Will not sit in Parliament) नाही, असे इम्रान खान (Imran Khan) म्हणाले होते.

Imran Khan said Will not sit in Parliament
अल्पवयीन मुलीवर बलात्कार; रक्तस्राव झाल्यानंतर घरातच मृत्यू

पंतप्रधान (Prime Minister) निवडीसाठी सोमवारी पाकिस्तानच्या नॅशनल संसदेचे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे अध्यक्ष शाहबाज शरीफ, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) उपाध्यक्ष आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी रविवारी या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

इम्रान खान (Imran Khan) यांना अविश्वास ठरावाद्वारे पदावरून हटवल्यानंतर नवीन नेत्याच्या निवडीची प्रक्रिया रविवारी सुरू झाली. सभागृहाचा विश्वास गमावल्यानंतर अविश्वास प्रस्तावाद्वारे पदावरून हटवले जाणारे इम्रान खान देशाच्या इतिहासातील पहिले पंतप्रधान ठरले आहेत. इम्रान खान यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधकांनी १७४ मते घेतली होती. सोमवारीही त्यांनी या संख्येची पुनरावृत्ती केल्यास शरीफ हेच पाकिस्तानचे पुढचे पंतप्रधान असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.