इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) संसदेपाठोपाठच स्वतःच्या घरात देखील अडचणीत सापडलेले दिसून येत असून, इम्रान खानचे तिसरे लग्नही तुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे वृत्त आहे. इम्रान खान आणि बुशरा बीबी (Bushra Bibi) यांच्यातील दुरावा वाढला असून त्यांचे नाते तुटण्याच्या मार्गावर असल्याचा दावा केला जात आहे. एवढेच नव्हे तर, बुशरा बीबी इम्रान खानचा राजवाडा सोडून लाहोरमध्ये मैत्रीणीच्या घरी गेल्याची चर्चा आहे. मात्र, इम्रान खान यांच्या पक्षाने हा संपूर्ण दावा फेटाळून लावला आहे. इम्रान खानची तिसरी बेगम म्हणजेच बुशरा बीबी स्वतःला 'आध्यात्मिक हीलर' असल्याचे सांगते. (Know About Imran Khan Wife Bushra Bibi)
इम्रान खानने त्यांची दुसरी पत्नी रेहम खानशी घटस्फोट (Divorce) घेतल्यानंतर 2018 मध्ये बुशरा बीबीशी लग्न केले होते. इम्रान खान गेल्या एक दशकापासून सुफी पंथाकडे वळाल्याचे मत पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने व्यक्त केले आहे. यादरम्यान इम्रान बुशरा बीबीच्या घरी वास्तव्य करत असत. दरम्यान, इम्रान खानसोबत लग्न केल्यानंतर बुशरा बीबीने इम्रान खानचा पक्ष पीटीआयवर ताबा मिळवला असून, बुशराने पक्षामध्ये स्वतःचा वेगळा गट केल्याची चर्चा पाकिस्तानी (Pakistan) माध्यमांमध्ये आहे. तसेच त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने त्यांच्याशी एकनिष्ठ असल्याचीही जोरदार चर्चा आहे.
बुशरा बीबी स्वतःला संबोधते आध्यात्मिक हीलर
पक्षांतर्गत विरोध किंवा महिलांच्या नाराजीबाबत इम्रान खान बुशराला पुढे करण्याचे काम करतात अशी देखील चर्चा आहे. यामुळे बुशरा बीबीला 'गॉडमदर' चा दर्जा देण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, पक्षाच्या सदस्यांची पक्षापेक्षा बुशरा यांच्यावर अधिक निष्ठा असल्याचेही म्हटले जाते. विशेष गोष्ट म्हणजे बुशरा 'ब्लॅक मॅजिक' करत असल्याचे देखील बोलले जाते. एवढेच काय तर बुशरा स्वतःला मिस्टिक आणि आध्यात्मिक हीलर (Spiritual Healer) म्हणून संबोधते असे देखील सांगितले जाते. एकदा दरवाजा उघडण्यास उशीर झाल्याचे कारण समोर करत संतापलेल्या बुशराने 20 पाकिस्तानी अधिकाऱ्यांची बदली केल्याचे देखील सांगितले जाते.
बुशराशिवाय माझे आयुष्य सोपे नाही : इम्रान
'मी माझ्या पत्नीशी प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करतो. तसेच सरकार चालवताना आणि गुंतागुंतीच्या परिस्थितींचा सामना करताना येणाऱ्या समस्यांबाबत देखील चर्चा करत असल्याचे इम्रान यांनी जर्मनीच्या डेर स्पीगल मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. मात्र, बुशरा बीबी यांच्या सरकारच्या कामकाजातील हस्तक्षेपावर देशातील विरोधी पक्षांकडूनही वेळोवेळी टीका होत असते. 'बुशरा बीबी माझी जीवनसाथी असून, तिच्याशिवाय माझे जीवन सोपे नाहीये. एवढेच नव्हे तर, मुलाखतीदरम्यान, इम्रान खान यांनी सरकार यशस्वीपणे चालवण्याचे सर्व श्रेय पत्नी बुशरा बीबी यांना देत संपूर्ण मुलाखतीदरम्यान बुशरा बीबीच्या बुद्धिमत्तेची अनेकदा प्रशंसा केली होती.
दरम्यान, एका मुलाखतीमध्ये बोलताना बुशरा म्हणाल्या होत्या की, पाकिस्तान भाग्यवान आहे ज्यांना इम्रान खानसारखा नेता मिळाला असल्याचे विधान केले होते. काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांचा पक्षातील महिला खासदार उजमा कारदार यांचा एक ऑडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. यामध्ये कारदार त्यांच्या एका पत्रकारसोबत इम्रान खानची तिसरी पत्नी बुशरा बीबी आणि पाकिस्तानी लष्करावर गंभीर आरोप केल्याचा दावा करण्यात आला होता. व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये पंतप्रधान इम्रान यांची पत्नी बुशरा बीबी देश चालवत असल्याचे म्हंटले होते. एवढेच नव्हे तर, इम्रान बुशरा यांना विचारल्याशिवाय कोणतेही काम करू शकत नसल्याचे म्हटले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.