नवी दिल्ली : संपूर्ण जगभरात खळबळ उडविलेल्या कोरोनाच्या नवा व्हेरिएंट आता हळूहळू पाय पसरू लागला आहे. दक्षिण अफ्रिकेत ओमिक्रॉन विषाणू आढळल्यानंतर जगातील अनेक देशांनी पुन्हा एकदा शिथिल केलेले निर्बंध पुन्हा एकदा लावण्यास सुरूवात केली आहे. यादरम्यान सौदी अरेबियामध्येदेखील ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण आढळल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे जगात हळूहळू ओमिक्रॉन विषाणू पाय पसरू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.
सरकारी न्यूज एजन्सीने दक्षिण अफ्रिकेतून सौदीमध्ये दाखल झालेल्या प्रवाशला कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉनची लागण झाल्याचे म्हटले आहे. दरमान, लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे विलगीकरण करण्यात आले आहे. ओमिक्रॉन विषाणू आतापर्यंत 14 देशांमध्ये आढळून आला आहे.
आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर
जगभरात आणि देशात ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेता 15 डिसेंबरपासून नियमित आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने एक आदेश जारी करुन ही घोषणा केली आहे. चारच दिवसापूर्वी म्हणजे 26 नोव्हेंबरला भारत सरकारने 14 देश वगळता इतर सर्व देशांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, ओमिक्रॉनच्या धोका लक्षात घेता आता आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.