नदीने पात्र बदललं आणि नेपाळ मधलं गाव भारतात आलं, काय आहे भारत-नेपाळ सीमावाद?

सुमारे ८० लाख नेपाळी नागरिक भारतात राहतात.
India and Nepal Border Disputes
India and Nepal Border Disputes sakal
Updated on

सुमारे 200 वर्षांपूर्वी, दोन देशांमधील सीमा म्हणून एक नदी निश्चित करण्यात आली. नदीचा पूर्व भाग हा एका देशाचा आणि पश्चिमेकडील भाग दुसऱ्या देशाचा होता. जसजसा काळ लोटला तसतसा नदीने आपला मार्ग बदलला आणि आता ही नदी पूर्वेकडील भागात वाहू लागली. त्यामुळे या दोन देशाचा सीमावादाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. हे देश दुसरे तिसरे कोणतेही नसून नेपाळ आणि भारत आहेत आणि ज्या नदीमुळे सीमावादाचा प्रश्न उद्भवत आहे, ती नदी नेपाळमध्ये नारायणी आणि भारतात गंडक म्हणून ओळखली जाते. (India and Nepal Border Disputes)

India and Nepal Border Disputes
अमेरिका हादरलं : हॉस्पिटलच्या आवारात तरुणाचा गोळीबार, शूटरसह 4 जणांचा मृत्यू

सुगौली करार

1816 मध्ये अँग्लो-नेपाळी युद्ध संपले आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि नेपाळ यांच्यात सुगौली करारावर स्वाक्षरी झाली. या कराराने नारायणी नदीला भारत आणि नेपाळमधील सीमा म्हणून मान्यता दिली.

या करारानुसार नदीचा पूर्व भाग भारताचा आणि पश्चिम भाग नेपाळचा होता पण बदलत्या काळात नदी पूर्वेकडे सरकली. सुगौली करारानुसार नदीच्या पश्चिमेचा भाग भारताच्या ताब्यात असल्याने हा भाग दोन्ही देशांमधील वादाचे कारण ठरला.

India and Nepal Border Disputes
कामासंदर्भात मस्क यांनी कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवत दिला इशारा

नेपाळचा असा विश्वास आहे की भारताने आपल्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. भारत आणि नेपाळमधील सीमा सुमारे 1,800 किमी लांबीची आहे. बिहारची नेपाळशी सुमारे ६०१ किमीची सीमा आहे, तर उत्तर प्रदेशची नेपाळशी सुमारे ६५१ किमीची सीमा आहे. नेपाळची सीमा भारतातील उत्तराखंड, सिक्कीम आणि पश्चिम बंगाल या राज्यांशीही आहे.

भारत आणि नेपाळ यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधात वाद तेव्हा निर्माण झाला जेव्हा 2020 मध्ये नेपाळने एक नवीन राजकीय नकाशा जारी केला ज्यामध्ये नेपाळने भारताच्या उत्तराखंड राज्याचा भाग मानला जाणारा कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेखचा प्रदेश आपल्या क्षेत्रात दाखवला.

India and Nepal Border Disputes
भारतीय अधिकाऱ्यांचा गट तालिबानी नेत्यांच्या भेटीला; 'या' विषयावर चर्चा

सीमावाद कसा सुटणार?

भारत आणि नेपाळ यांच्यातील सीमावाद केव्हा मिटणार यासाठी 2014 मध्ये एक एक बाउंड्री वर्किंग ग्रुप करण्यात आला होता पण सीमावाद अजूनही सुटलेला नाही.

खरं तर भारत आणि नेपाळमध्ये शतकानुशतके जुने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. या दोन्ही देशातील नागरीक व्हिसाशिवाय दुसऱ्या देशात जाऊ देते. सुमारे ८० लाख नेपाळी नागरिक भारतात राहतात आणि काम करतात तर सुमारे सहा लाख भारतीय नेपाळमध्ये राहतात.यामुळेच या दोन्ही देशातील सीमावाद कधीतरी सुटेल अशी आशा प्रत्येकाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.