रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अधिकच तीव्र होत चालले आहे. यामुळे सर्व जगाच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान युक्रेनमध्ये अनेक विद्यार्थी अडकले असुन त्यांना बाहेर काढण्याकरीता शर्थीचे प्रयत्न सुरु आहे अशातच युक्रेनच्या मुद्द्यावर UNSC ची बैठक पार पडली. या बैठकीत युक्रेनमधील विद्यार्थ्यांना माघारी आणण्यासाठी तात्काळ प्राधान्य दिले जाणार असल्याबाबत चर्चा करण्यात आली. या संदर्भात भारताने भुमिका स्पष्ट करताना सर्व सदस्य राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय कायदा आणि UN चार्टरच्या तत्त्वांचा सन्मान करण्याचे आवाहन केले. (India appealed for all member states of unsc to honour principles of international law & un charter)
भारताने सर्व सदस्य राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय कायदा आणि UN चार्टरच्या तत्त्वांचा सन्मान करण्याचे आवाहन केले, भारतीय समुदायाची सुरक्षा, तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची तात्काळ सुटका करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल,यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. युक्रेन रशियामधील युद्धामुळे सर्व राष्ट्रे व्यथित झाले आहे. हि हिंसा तात्काळ संपवण्यासाठी प्रयत्न केले जावेत अशी आमची विनंती असल्याचे भारताने UNSC च्या बैठकीत म्हटले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.