India Canada Tension: 6 जण, 2 बाईक्स, 50 गोळ्या; निज्जरच्या हत्येचा कॅनडामधील व्हिडिओ आला समोर

खलिस्तानवादी निज्जरच्या हत्येवरुन कॅनडा आणि भारतातील संबंध बिघडले आहेत.
Nijjar
Nijjar
Updated on

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानं भारत आणि कॅनडातील राजनैतिक संबंध तणावाचे बनले आहेत. कॅनडानं या हत्येमागं भारताचा हात असल्याचं गंभीर आरोपही केला आहे. या पार्श्वभूमीवर या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला असून त्याला कसं मारण्यात आलं याचा खुलासा झाला आहे. (India Canada Tension 6 people 2 bikes 50 bullets video available of killing of Nijjar in Canada)

Nijjar
Rain Update: पुणे, मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; घाटांतील प्रवाशांना 'सतर्क'तेचा इशारा

सीसीटीव्ही फुटेज समोर

टाइम्स नाऊने 'दि वॉशिंग्टन पोस्ट'च्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तात म्हटलं की, १८ जून रोजी कॅनडातील ब्रिटिश कोलंबियातील गुरुनानक शीख गुरुद्वाराबाहेरचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या गुरुद्वाराबाहेरच हरदीपसिंग निज्जरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

सहा लोक दोन बाईक्सवरुन आले आणि त्यांनी निज्जरवर गोळ्यांचा वर्षाव केला, यामध्ये सुमारे ५० गोळ्या झाडण्यात आल्या. यामधील ३४ गोळ्यांनी त्याच्या शरिराची अक्षरशः चाळण झाली, असं या वृत्तात म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Nijjar
Video: पुण्यात गणपती देखाव्याच्या कळसाला आग; भाजपाध्यक्ष नड्डांच्या हस्ते आरती सुरु असताना घडला प्रकार

व्हिडिओत दिसले मारेकरी

दरम्यान, घटनास्थळाजवळील काही व्यापारी लोक आणि रहिवाशांनी सांगितलं की, तपास अधिकाऱ्यांनी आमच्याकडं या घटनेबाबत चौकशी केली नाही की सिक्युरिटी व्हिडिओची देखील मागणी केली नाही. पण गुरुद्वाराच्या सुरक्षा कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. याचा व्हिडिओ तपास पथकाला देण्यात आला आहे.

९० सेकंदाच्या या व्हिडिओच्या सुरुवातीला निज्जरचा राखाडी रंगाचा पिकअप ट्रक पार्किंगमधून बाहेर येताना दिसतो आहे. या पार्किंगच्या शेजारी एक पांढऱ्या रंगाची सेडान कार दिसते आहे. यावेळी ट्रक बाहेर येत असताना ही कार त्याला आडवी जाते. यानंतर हुडी घातलेले दोन तरुण दोन बाईक्सवरुन येतात आणि ट्रकच्या ड्रायव्हरजवळ जातात, आणि निज्जरवर गोळीबार करतात. (Marathi Tajya Batmya)

Nijjar
Pankaja Munde: "देव न करो, ती वेळ येवो"; पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद

५० गोळ्या झाडल्या

तपास पथकाला माहिती देताना भुपिंदरजीत सिंग यांनी सांगितलं की, "मारेकऱ्यांनी ५० गोळ्या चालवल्या, यांपैकी ३४ गोळ्या निज्जरला लागल्या. या घटनेनंतर सिंग स्वतः निज्जरच्या ट्रकजवळ गेले आणि त्यांनी बाजूचा दरवाजा उघडला तसेच निज्जरच्या खांद्याला ओढून त्याला बाहेर काढलं. यावेळी माझे हातही रक्तानं माखले होते. सगळीकडं काचेचे तुकडे पडले होते, तसेच खाली रस्त्यावर गोळ्यांचे शेल्फ पडले होते," असं सिंग यांनी सांगितलं.

Nijjar
India Canada Tension: 6 जण, 2 बाईक्स, 50 गोळ्या; निज्जरच्या हत्येचा कॅनडामधील व्हिडिओ आला समोर

कॅनडा-भारतामध्ये तणाव

निज्जर मुळचा पंजाबचा असला तरी त्याच्याकडं कॅनडाचं नागरिकत्व होतं. भारताकडून त्याला सन २०२०मध्ये दहशतवादी घोषीत करण्यात आलं होतं. कॅनडात त्याची हत्या झाल्यानं यामागे भारताचाच हात असल्याचा आरोप कॅनडानं केला आहे. पण भारतानं सर्व आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, कॅनडानं भारतीय उच्चायुक्तांना निलंबित केल्यानंतर भारतानंही कॅनडाच्या उच्चाधिकाऱ्यांची हाकालपट्टी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.