जागतिक अर्थव्यवस्था या वर्षी तीन टक्क्यांपेक्षा कमी दराने वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र या वर्षात जागतिक विकासात भारत आणि चीनचा निम्मा वाटा असेल.
वॉशिंग्टन - जागतिक अर्थव्यवस्था या वर्षी तीन टक्क्यांपेक्षा कमी दराने वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र या वर्षात जागतिक विकासात भारत आणि चीनचा निम्मा वाटा असेल, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाची साथ आणि रशियाचे युक्रेनवरील आक्रमण यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत तीव्र मंदी चालूच राहील. त्यामुळे पुढील पाच वर्षांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ तीन टक्क्यांपेक्षा कमी होईल, असा अंदाज आहे. आर्थिक मंदीचा कालावधी दीर्घकाळ राहील, असा इशाराही त्यांनी दिला. अशा परिस्थितीत काही उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमुळे वाढीला चालना मिळते. सध्या आशिया विशेषतः भारत आणि चीनकडून ही अपेक्षा आहे. जागतिक वाढीत २०२३ मध्ये भारत आणि चीनचा निम्मा वाटा अपेक्षित आहे, असे जॉर्जिव्हा यांनी स्पष्ट केले.
२०२१ मध्ये अर्थव्यवस्था सावरत असताना युक्रेन आणि रशियामधील युद्धाचा तीव्र फटका बसला. या युद्धामुळे २०२२ मध्ये जागतिक वाढीचा दर ६.१ टक्क्यावरून जवळजवळ निम्म्याने म्हणजे ३.४ टक्क्यांपर्यंत घसरली. मंदावलेली वाढीची गती हा मोठा फटका आहे. यामुळे गरीब देशांना विकासाची गती गाठणे कठीण होईल. यामुळे गरिबी आणि उपासमार आणखी वाढू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
पुढील आठवड्यात आयएमएफ आणि जागतिक बँकेची बैठक होणार असून, त्यात जागतिक अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी धोरणकर्ते एकत्र येतील. जगभरातील मध्यवर्ती बँका महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदर वाढवत आहेत. त्यामुळे सुमारे ९० टक्के प्रगत अर्थव्यवस्थांचा विकास दर या वर्षी घसरण्याचा अंदाज आहे, असेही जॉर्जिव्हा म्हणाल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.