गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत आणि चीन या दोन देशांमध्ये दीर्घ काळापासून तणावाचे वातावरण राहिले आहे. यादरम्यान आता दोन्ही देशांकडून संबंध सुधारावेत यासाठी काही महत्वपूर्ण पाऊले उचलली जात आहेत. याचाच भाग म्हणून भारत आणि चीन २८-२९ ऑक्टोबरपर्यंत वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण करतील, यासंबंधीचे वृत्त एएनआयने दिले आहे. दोन्ही बाजूंनी लष्कर मागे घेतल्यानंतर एलएसीवरील काही ठराविक भागात पेट्रोलिंग सुरू करण्यात येईल असे वृत्त पीटीआयने दिले आहे.