दबाव सहन करणार नाही, रशियाबाबत भारताने स्पष्ट केली भूमिका

अमेरिकेशी पुढील आठवड्यात होणाऱ्या वार्ता पूर्वीच भारताने रशियाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
Narendra Modi And Vladimir Putin
Narendra Modi And Vladimir Putin esakal
Updated on

दिल्ली : अमेरिकेशी पुढील आठवड्यात होणाऱ्या टू प्लस टु वार्ता पूर्वीच भारताने रशियाबरोबरील आर्थिक संबंधांविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. रशिया (Russia) आंतरराष्ट्रीय निर्बंधांना तोंड देत आहे. दुसरीकडे सरकार सध्याच्या परिस्थितीत दोन्ही देशांदरम्यान असलेले संबंध स्थिर करण्यावर लक्ष केंद्रीत करित आहे. सरकारने रशियाशी व्यापारी संबंध तोडावे यासाठी भारतावर कोणतेही आंतरराष्ट्रीय दबाव नसल्याचे सांगितले. दोन्ही देश पैशाच्या देवाण-घेवाणासाठी एका तंत्राला अंतिम रुप देण्यावर काम करित आहे. (India Clear Stand On Russia Before Talks With America)

Narendra Modi And Vladimir Putin
रोहित तू बिनधास्त जा, नितीन गडकरींनी आबांच्या लेकाला दिला शब्द

यातून त्यांना व्यापार करण्यास परवानगी मिळेल. रशियातून भारताची तेल आयात वाढू नये, अशी व्यूहरचना अमेरिकेकडून होत आहे. मात्र भारत (India) सरकारने स्पष्ट म्हटले आहे, की भारताच्या ऊर्जा देवाण-घेवाणाचे राजकीयकरण होऊ इच्छित नाही. निर्बंधांवर चर्चा होतेय. मात्र ते पूर्ण व्यापारावर नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची म्हणाले, सर्व व्यापार एकाच वेळी चालू आहे. तसेच तेलाचा व्यापार ही. आमचे लक्ष्य रशियाबरोबर असलेले आर्थिक संबंध स्थिर ठेवणे हे आहे.

Narendra Modi And Vladimir Putin
रशियाची नवीन युद्ध नीती ! युक्रेनने जर्मनीकडे मागितली शस्त्रे

ते म्हणाले, की भारत रशियाबरोबर असलेले आपले संबंध बहरत आहे. प्रवक्ते बागची अमेरिकेने केलेल्या वक्तव्यावर बोलत होते. सरकार म्हणाले, की परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ११ एप्रिल रोजी चौथे भारत अमेरिका (America) २ अधिक २ संवादात भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. वार्ताच्या कार्यक्रमात युक्रेनचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. जयशंकर हे आपले अमेरिकेचे समकक्ष ब्लिंकन यांची स्वातंत्रपणे भेट घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.