UNSC मध्ये भारताला मिळणार कायमचं सदस्यत्व? ब्रिटनपाठोपाठ फ्रान्सचाही पाठिंबा

यापूर्वी यूकेनंही UNSC च्या स्थायी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दिला होता.
United Nations Security Council
United Nations Security Councilesakal
Updated on
Summary

यापूर्वी यूकेनंही UNSC च्या स्थायी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दिला होता.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (United Nations Security Council UNSC) स्थायी सदस्यत्वासाठी भारताला युनायटेड किंगडमनंतर फ्रान्सचा (France) पाठिंबा मिळाला आहे. भारताबरोबरच (India) जर्मनी, जपान आणि ब्राझील या देशांनाही पाठिंबा मिळाला.

United Nations Security Council
G20 Summit : नरेंद्र मोदींच्या 'त्या' विधानाचं अमेरिकेकडून तोंडभरुन कौतुक, असं काय म्हणाले पंतप्रधान?

शुक्रवारी UNSC च्या सुरक्षा परिषदेत संबोधित करताना फ्रेंच उपप्रतिनिधी नॅथली ब्रॉडहर्स्ट एस्टिव्हल (Nathalie Broadhurst Estival) म्हणाल्या, "फ्रान्स कायमस्वरूपी जागेसाठी कायम सदस्य म्हणून जर्मनी, ब्राझील, भारत आणि जपानच्या उमेदवारांना समर्थन देईल. आम्हाला परिषदेच्या स्थायी सदस्यांसह आफ्रिकन देशांचे अधिक प्रतिनिधित्व हवे आहेत. कारण, भौगोलिक प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी अनेक जागा वितरित केल्या पाहिजेत."

United Nations Security Council
महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....
United Nations Security Council
United Nations Security Council

यापूर्वी, यूकेनंही UNSC च्या स्थायी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दिला होता. आम्ही भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझीलसाठी नवीन कायमस्वरूपी जागा निर्माण करण्यास तसंच परिषदेवर कायम आफ्रिकन प्रतिनिधीत्वास समर्थन देतो, असं संयुक्त राष्ट्रातील ब्रिटनच्या राजदूत बार्बरा वुडवर्ड (Barbara Woodward) यांनी सांगितलं. वुडवर्ड म्हणाल्या, 'यूके सदस्यत्वाच्या तात्पुरत्या श्रेणीच्या विस्तारास देखील आमचं समर्थन राहिल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.