आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेसाठी भारताचा मदतीचा हात, देणार ६६७० कोटी

भारताचा शेजारी देश श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
PM Narendra Modi With Sri Lankan Prime Minister
PM Narendra Modi With Sri Lankan Prime Ministeresakal
Updated on

नवी दिल्ली : भारताचा शेजारी देश श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या स्थितीत भारत श्रीलंकेच्या मदतीला पुढे आला असून ६ हजार ६७० कोटी रुपये मदत करणार आहे. यात दोन हजार ९६५ कोटी रुपये रोख आणि ३ हजार ७०५ कोटींचा डेफर्ड पेमेंटचा समावेश आहे. भारतीय उच्चायुक्त (Indian High Commission) गोपाळ बागळे यांनी श्रीलंकेच्या (Sri Lanka) केंद्रीय बँकेचे अजित निवार्ड कबराल यांची भेट घेतली असून मदतीची हमी दिली आहे. ते म्हणाले, की भारत श्रीलंकेबरोबर (India Sri Lank Relation) आहे.

भारत श्रीलंकेबरोबर

श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्ताने ट्विट करुन सांगितले, की या ६ हजार ६७० कोटी रुपयांपैकी ३ हजार ७०५ कोटी रुपयांचे एशियन क्लिअरिंग युनियन करार स्थगित करणे आणि २ हजार ९६५ कोटी रोख आदींचा समावेश आहे. गोपाळ बागळेचे म्हणणे आहे की हे पाऊल आर्थिक सुधारणा आणि विकासासाठी श्रीलंकेबरोबर उभे राहणे ही भारताचे कर्तव्य आहे. (India Give 6679 Crore Rupees Aid To Sri Lanka)

PM Narendra Modi With Sri Lankan Prime Minister
पत्रकार कमाल खान यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

बासील राजपक्षे यांनी मागितली होती मदत

श्रीलंकेचे अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांनी डिसेंबर २०२१ मध्ये नवी दिल्लीचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी आर्थिक संकटात सापलेल्या श्रीलंकेला मदत करण्याची विनंती केली होती. आर्थिक तज्ज्ञांनुसार श्रीलंका गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. कारण देशाला कोरोडो रुपयांचे कर्ज फेडायचे आहे. या कारणामुळे श्रीलंका नवीन कर्जाच्या जाळ्यात अडकू शकते.

PM Narendra Modi With Sri Lankan Prime Minister
श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; लोकांकडे दूध घ्यायलाही पैसे नाही

श्रीलंकेची चीनकडेही मदतीची मागणी

श्रीलंकेने चीनकडून कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतलेले आहे. असे असतानाही चीनकडे ही मदतीची मागणी केली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमातील वृत्तांनुसार गेल्या आठवड्यात चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या कोलंबो भेटी दरम्यान श्रीलंकेने चीनकडे मदतीची मागणी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()