भारताचा चीनला शह; मॉरिशसच्या बेटावर लष्करी तळाची उभारणी?

port
port
Updated on
Summary

भारत मॉरिशसच्या (Mauritian) आगलेगा बेटावर (island of Agalega) लष्करी तळ उभारत असल्याची माहिती अल जझीरा या वृत्तसंस्थेने दिली आहे. सॅटेलाईट इमेजेस आणि स्थानिक लोकांच्या माहितीच्या आधारे अल जझीराने हे वृत्त दिलंय.

पोर्ट लुईस- भारत मॉरिशसच्या (Mauritian) आगलेगा बेटावर (island of Agalega) लष्करी तळ उभारत असल्याची माहिती अल जझीरा या वृत्तसंस्थेने दिली आहे. सॅटेलाईट इमेजेस आणि स्थानिक लोकांच्या माहितीच्या आधारे अल जझीराने हे वृत्त दिलंय. दाव्यानुसार, आगलेगा बेट भारतीय नौदलाच्या ऑपरेशनसाठी वापरले जाणार आहे. असे असले तरी भारत सरकारने अल जझीराच्या रिपोर्टवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (international Latest Marathi news)

आगलेगा बेट मॉरिशसच्या मुख्य भूमिपासून जवळपास १ हजार १०० किलोमीटर अंतरावर आहे. बेटाची लांबी १२ किलोमीटर लांब आणि रुंदी १.५ किलोमीटर आहे. आगलेगा बेटावर जवळपास ३०० लोकांचा रहिवास आहे. अल जझीराच्या दाव्यानुसार, भारत विविध सामरिक मोहिमांसाठी या बेटाचा वापर करणार आहे. सध्या एअरक्राफ्ट उतरण्यासाठी बेटावर ८०० मीटरची लँडिंग स्ट्रिप आहे, पण येत्या काळात जगातील सर्वात मोठे एअरक्राफ्ट उतरवण्याची क्षमता तयार केली जात आहे.

port
MPSC: संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबरला

दक्षिण हिंदी महासागर आणि मोझांबिक्यू चॅनलवर पकड मजबूत करण्यासाठी भारत हवाई आणि नौदलाची उपस्थिती वाढवत आहे. याचा फायदा भारताला प्रदेशातील देखरेखेसाठी होणार असल्याचं सांगण्यात येतंय. बेटावरील लष्करी तळ जहाजांना उतरवण्यासाठी आणि P-8I एअरक्राफ्टच्या उड्डाणासाठी वापरले जाणार आहे, अशी माहिती Observer Research Foundation ORF चे सदस्य अभिषेक मिश्रा यांनी दिली.

port
भाजपने उत्तर प्रदेशमधील ४० मंत्र्यांना दिले टास्क

दक्षिण हिंदी महासागर भारतासाठी महत्त्वाचा आहे. भारतीय जहाजांना मदतीसाठी याठिकाणी एक हवाईतळ असणे आवश्यक होते. त्या दृष्टीने आगलेगा बेटावर हे तळ विविध अर्थाने महत्त्वाचे ठरणार आहे. जवळपास गेल्या दोन वर्षांपासून याठिकाणी मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन काम हाती घेण्यात आलं आहे. २०१५ मध्ये भारताने या बेटाचा ताबा घेतला होता. सॅटेलाईट इमेजनुसार याठिकाणी ३ किलोमीटरचा रनवे दिसून येत आहे. मोठे एअरक्राफ्ट उतरवण्यासाठी ते सक्षम आहे. विमानतळाचा विकासही याठिकाणी केला जात आहे. २०१८ मध्येच यासंदर्भात बातम्या बाहेर आल्या होत्या, पण मॉरिशस आणि भारताने कन्स्ट्रक्शनचे काम लष्करी हेतूसाठी नसल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, हिंद महासागरात चीन आपला प्रभाव वाढवू पाहात आहे. हाच धोका लक्षात घेत भारताने पाऊल उचलले असल्याचं म्हटलं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.