Shinzo Abe : "भारतानं आपला मित्र गमावला"; शिंजो अबेंना श्रद्धांजली वाहताना PM मोदी भावूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमासाठी जपानला गेले आहेत.
PM Modi_Shinzo Abe
PM Modi_Shinzo Abe
Updated on

टोकियो : जपान आणि भारताचे द्विपक्षीय संबंध हे कायमच मित्रत्वाचे राहिले आहेत. त्यामुळेच जेव्हा जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांची हत्या झाली. तेव्हा भारतानं या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला होता. तसेच भारतानं आपला चांगला मित्र गमावल्याची भावना व्यक्त केली होती. त्याचाच पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा केला आहे. दिवंगत अबे यांच्यावर आज शासकीय इतमामात अत्यंसंस्कार पार पडले. या कार्यक्रमाला मोदींनी हजेरी लावली असून यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (India lost our friend PM Modi emotional while paying tribute to Shinzo Abe)

शिंजो अबे यांच्यावर जपानची राजधानी टोकियो येथील निप्पॉन बुडोकन हॉल इथं शासकीय इतमामात अत्यंसंस्कार केले जात आहेत. या अत्यंसंस्काराच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कालच जपानकडे रवाना झाले होते, त्यानंतर आज त्यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमाला हजेरी लावली.

PM Modi_Shinzo Abe
PFI Row : कोरोनाकाळात पुणे महापालिकेने घेतली होती PFIची मदत; झाला होता करार

या कार्यक्रमाचा व्हिडिओ समोर आला असून यामध्ये मोदींसोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानिस हे देखील दिसून येत आहेत. यासाठी ७०० हून अधिक परदेशी मान्यवर मंडळी टोकियोमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये विविध देशांचे एकूण ५० हून अधिक पंतप्रधान आणि राष्ट्रपती सहभागी झाले आहेत.

PM Modi_Shinzo Abe
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना फटके द्यायला पाहिजेत, निलेश राणेंचा हल्लाबोल

राजकीय अंत्यसंस्काराची सुरुवात जपानचे विद्यमान पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याकडे अस्थी देऊन झाली, जे एका पेटीत ठेवलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ती पेटी औपचारिकपणे लष्करी अधिकार्‍यांकडे सुपूर्द केली. आपल्या हत्या झालेल्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी निप्पॉन बुडोकन हॉलमध्ये अबे यांचे प्रमुख क्षण दाखविणारे व्हिडिओ देखील दाखवले गेले.

प्रचारादरम्यान झाला होता गोळीबार

जपानमधल्या आगामी निवडणुकीसाठी प्रचार करत असताना जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर ८ जुलै २०२२ रोजी गोळीबार झाला. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर १५ जुलै रोजी अंत्यसंस्कार पार पडले. आता जवळपास तीन महिन्यांनंतर त्यांच्यावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.