India Pakistan Love Story : अंजूच्या एका कृतीची मला भीती वाटली, मी माझा चेहरा लपवला' : नसरुल्लाहने सांगितला भन्नाट किस्सा !

anju and nasarulla love story
anju and nasarulla love storysakal
Updated on

India Pakistan Love Story : मूळ भारतीय नागरिक असलेली अंजू सध्या पाकिस्तानी मीडियामध्ये चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. व्हिसा घेऊन भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूनेे इस्लाम धर्म स्वीकारला आहे. सध्या ती पाकिस्तानात पाकिस्तानी मीडियाला मुलाखती देत आहे. एका मुलाखती दरम्यान तिचा नवरा नसरुल्ला याने काही खुलासे केले आहेत.

अंजूसोबत त्याचे सुरुवातीचे संभाषण फेसबुकवर झाले, त्यानंतर तिने थेट व्हॉट्सअॅप नंबर मागितला. यानंतर चॅटिंग करण्याऐवजी अंजूने नसरुल्लाला व्हिडीओ कॉल केला जेणेकरून तो त्याचा चेहरा पाहू शकेल.

anju and nasarulla love story
Peru Alien News : सात फुटांच्या एलियनने गावकऱ्यांवर केला हल्ला, बंदूकीच्या गोळ्यांनाही देत नाही दाद; प्रत्यक्षदर्शींचा दावा!

अंजूने असा व्हिडिओ कॉल केल्याने तो घाबरला होता, त्याला काय करावे हे समजत नव्हते. यानंतर नसरुल्लाहने व्हिडीओ कॉल उचलला पण यादरम्यान त्याने आपला चेहरा लपवून ठेवला, त्यानंतर अंजूने त्याला त्याच्या चेहऱ्यावरून हात काढण्यास सांगितले आणि तिला नसरुल्लाची अस्वस्थता समजली.

anju and nasarulla love story
Satara Crime : प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पवारांचा काढला काटा; गळा आवळून, हात-पाय बांधून मृतदेह फेकला कालव्‍यात

अंजूने पाकिस्तानी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'जेव्हा नसरुल्लाहने तिला सांगितले की मी पाकिस्तानचा आहे, तेव्हा मला ते खूप आवडले, मी खूप उत्साहित झाले. पाकिस्तानबद्दल ऐकून मला कोणतीही भीती वाटली नाही. आमची मैत्री घट्ट झाली आणि आम्ही फेसबुकवरून व्हॉट्सअॅपवर गेलो आणि बोलू लागलो. मग आम्ही भेटण्याचा बेत आखला आणि नसरुल्लाहने सांगितल्याप्रमाणे ती पाकिस्तानला पोहोचली'.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.