आत्मनिर्भर भारताचे 'ब्रह्मोस' खरेदी करणार फिलीपाईन्स; थायलंड-इंडोनेशियाशी चर्चा सुरु

brahmos
brahmos
Updated on

नवी दिल्ली : भारताने गेल्या मंगळवारी फिलीपाईन्ससोबत 'सरंक्षण साहित्य आणि उपकरणा'च्या विक्रीकरता एका प्रमुख करारावर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये भारताने तयार केलेले ब्रह्मोस क्रूज मिसाईल समाविष्ट असण्याची शक्यता आहे. फिलीपाईन्सचे सुरक्षा सचिव डेलफिन लॉरेंजाना हे मनीलामध्ये या करारावर स्वाक्षरी करताना उपस्थित होते. त्यांनी याबाबत माहिती देताना म्हटलंय की फिलीपाईन्स ब्रह्मोस मिसाईल खरेदी करत आहे. फिलीपाईन्सच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागाने मंगळवारी फेसबुकवर म्हटलंय की सुरक्षा अंडरसेक्रेटरी रायमुंडो एलेफंटे आणि फिलीपाईन्समधील भारताचे राजदूत शंभू एस कुमारन यांनी सरंक्षण साहित्य आणि उपकरणांच्या खरेदीसाठीच्या 'अंमलबजावणीच्या व्यवस्था करारा'वर हस्ताक्षार केले आहेत. या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं गेलंय की लॉरेंजाना देखील यावेळी उपस्थित होते.

याबाबतचं वृत्त 'द स्ट्रेट्स टाइम्स'ने दिलंय. त्यांनी लॉरेंजानाच्या हवाल्याने म्हटलं की आम्ही ब्रह्मोस मिसाईल खरेदी करत आहोत. त्यांनी म्हटलं की, हा करार भारत आणि फिलीपाईन्स या दोन्ही देशांसाठी संरक्षण खरेदीच्या धोरणांमध्ये आणि प्रक्रियांमध्ये एक मार्गदर्शकाच्या रुपात काम करेल. मात्र, हा करार म्हणजे दोन्ही देशांमधील संरक्षणविषयक उपकरणांच्या खरेदीमधला मूलभूत करार आहे. याचा अर्थ असा नव्हे की ब्रह्मोसच्या विक्रीबाबतचाच हा करार आहे. 

भारताची या देशांसोबत सुरुय चर्चा
भारताने गेल्या काही वर्षांमध्ये थांयलंड, इंडोनेशिया आणि व्हिएतनामसहित अनेक दक्षिण पूर्व आशिया देशांसोबत बातचित करत आहे. त्यांना ब्रह्मोस मिसाईल विक्रीसंदर्भात ही चर्चा सुरु आहे. 

काय आहे ब्रह्मोस मिसाईल?
ब्रह्मोस हे भारतीय बनावटीचे स्वदेशी मिसाईल आहे. या मिसाईलची निर्मिती भारत आणि रशिया या दोन्ही देशांनी मिळून केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि रशियाची संयुक्त अशी टीम जी या मिसाईलची निर्मिती करते ती लवकरच फिलीपाईन्सच्या सेैन्याला ब्रह्मोस मिसाईल देण्यासंबंधीचा करार करणार आहे. ‘ब्रह्मोस’ हे भारताच्या ताफ्यातील सर्वात घातक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. हवेतून जमिनीवर मारा करणारे ब्रह्मोस हे भारताचे सर्वात घातक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता असलेले ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र हिंदी महासागरातील चिनी युद्धनौकांना तसेच तिबेट आणि शिनजियांगमधील चीनच्या धावपट्टयांना नेस्तनाबूत करु शकते. ब्रह्मोसचे वैशिष्ट्य म्हणजे सुखोई Su-30 MKI या फायटर जेटमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येते. त्यामुळे ब्रह्मोसमधून होणारा हल्ला अधिका घातक आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.