चीनचा भारताला इशारा; हा तर अमेरिकेचा डाव

India plays with fire: Chinese mouthpiece on G7 expansion
India plays with fire: Chinese mouthpiece on G7 expansion
Updated on

नवी दिल्ली : चीनने भारताला इशारा दिला असून आघाडीच्या अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांची संघटना असलेल्या जी सेव्हनमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करणारा भारत आगीशी खेळत असल्याचे म्हटले आहे. चीन सरकारचे मुखपत्र असणाऱ्या ग्लोबल टाइम्समधील लेखामधून हे मत चीनने मांडले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

जी-सेव्हन विस्तारामध्ये सहभागी होत भारत आगीशी खेळत आहे, अशा मथळ्याखाली ग्लोबल टाईम्समध्ये लेख छापण्यात आला आहे. या लेखामधून चीनने भारताला या संमेलनामध्ये सहभागी करुन घेण्यामागे अमेरिकेचा वेगळाच हेतू असल्याचे म्हटले आहे. भारताचा समावेश करुन घेत हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागरामधील आपली ताकद वाढवण्याचा अमेरिकेचा इरादा असून चीनची कोंडी करण्यासाठी हा डाव असल्याचे म्हटले आहे.

जी सेव्हनचा विस्तार करण्याचा विचार हा भूप्रदेशासंदर्भातील राजकारणावर आधारित आहे. या विस्ताराचे मूळ हेतू हा चीनला कोंडीत पकडण्याचा आहे. भारत हा जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याने त्याला या परिषदेमध्ये सामावून घेतलं जात नसून अमेरिका भारताला आपल्या हिंदी महासागरातील योजनांचा महत्वाचा जोडीदार समजत आहे. या क्षेत्रामध्ये चीनची वाढत्या ताकदीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिका भारताला मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे या लेखात म्हटले आहे.

या लेखाचा मुळू स्त्रोत काय?
ग्लोबल टाईम्सचे पत्रकार यू जिनकुई यांनी लियू झोंगी यांच्या मुलाखतीवर आधारित हा लेख लिहिला आहे. झोंगी हे शांघाय इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल स्टडीजमधील चीन-दक्षिण आशिया सहकार्याच्या संशोधन केंद्राचे सरचिटणीस आहेत. त्यामुळे या लेखामधून चीन भारत आणि अमेरिकेमधील वाढत्या संबंधांकडे कशाप्रकारे पाहत आहे याचा अंदाज बांधता येतो. हा लेख पाच जून रोजी प्रकाशित झाला आहे.

मूळ प्रकरण काय आहे?
जगातील सात आघाडीच्या आर्थिक महासत्ता असणाऱ्या देशांची संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'जी-७' या संघटनेची पुनर्रचना करण्याचा घाट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घातला आहे. भविष्यात या संघटनेचे स्वरूप हे 'जी-१०' किंवा 'जी-११' असे असू शकते. यामध्ये भारत,  ऑस्ट्रलिया, दक्षिण कोरिया आणि रशिया या देशांचाही समावेश व्हावा म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आग्रही आहेत

१९७३ मध्ये या संघटनेचे स्वरूप 'जी-४' असे होते पण नंतर कालानुरूप विस्तार होत गेला. येत्या सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेचे संमेलन होणार असून त्याचवेळी संघटनेचेही संमेलन होण्याची शक्यता आहे. आता देखील या संघटनेचे संमेलन रद्द करताना ट्रम्प यांनी म्हटले आहे की, 'या संघटनेचे संमेलन मी तात्पुरते पुढे ढकलत आहे, सध्या ही संघटना सगळ्या जगाचे प्रतिनिधित्व करते असे मला मुळीच वाटत नाही. काही देशांचा हा समूह हा कालबाह्य झाला असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करत भारताला जी-७ देशाच्या समूहात सामील करण्याविषयी चर्चा केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()