नवी दिल्ली- ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना स्कॉटलँडच्या एका गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले होते. भारतीय उच्चायुक्तांना काही खलिस्तानी समर्थकांनी रोखल्याचं सांगण्यात येतंय. यावरुन भारताने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर ब्रिटन सरकारकडून यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारात जाण्यापासून रोखणे गंभीर प्रकरण आहे. भारताने याची दखल घेत दोषींवर कारवाई करण्याची मागणी ब्रिटनकडे केली आहे. यावर ब्रिटनने कारवाई करण्याची तयारी सुरु केल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर भारताने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. (High Commissioner Vikram Doraiswami was allegedly prevented from entering a gurdwara in Scotland )
व्हिडिओमध्ये भारतीय उच्चायुक्त दोराईस्वामी आपल्या गाडीमधून स्कॉटलँडच्या ग्लासगो येथे गुरुद्वाराकडे निघाले होते. त्यावेळी दोन खलिस्तानी समर्थकांनी त्यांना गुरुद्वारात प्रवेश करण्यापासून रोखलं. यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये, या कारणासाठी विक्रम दोराईस्वामी यांनी गुरुद्वारात न जाण्याचा निर्णय घेतला. तेथून ते आपल्या गाडीतून न उतरता तसेच परत गेले.
'शीख यूथ यूके' या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात दोन खलिस्तानी समर्थक व्यक्ती दोराईस्वामी यांच्या गाडीला अडवताना दिसत आहेत. या पेजवर म्हणण्यात आलंय की, 'ते कॅनडामध्ये शीखांना त्रास देत आहेत. त्यामुळे इतर शीखांनी आमच्या प्रमाणे भारतीय राजदुतांना रोखलं पाहिजे.' यात कॅनडाच्या पंतप्रधानांच्या वक्तव्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
कॅनडामध्ये भारतीयांना धमकी दिल्या जात आहेत. यापार्श्वभूमीवर ब्रिटनमधील या घटनेला महत्त्व प्राप्त झाले आहे. असे असले तरी कॅनडा आणि ब्रिटनमधील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. काही लोकांच्या कृत्यामुळे पूर्ण समाजाचा याला विरोध आहे असं म्हणता येणार नाही.या दोन खलिस्तान समर्थकांचा गुरुद्वाराशी काहीही संबंध नसल्याचे समजते. तसेच ब्रिटन सरकारने याची त्वरित दखल घेत कारवाईसाठी तयारी सुरु केली आहे. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.