India-Russia: भारताचा खरा मित्र! रशियामध्ये किती भारतीय राहतात? त्याठिकाणी जाऊन कोणतं काम करतात? जाणून घ्या

How many Indians live in Russia? भारत आणि रशियामधील नाते खूप जुनं आहे. शेकडो वर्षांपासून भारत आणि रशियामध्ये देवाणघेवाण सुरू आहे.
pm Modi And Putin
pm Modi And Putin
Updated on

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रशियाच्या दौऱ्यावर जात आहेत. पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलं आहे. भारत आणि रशियामधील नाते खूप जुनं आहे. शेकडो वर्षांपासून भारत आणि रशियामध्ये देवाणघेवाण सुरू आहे. किती भारतीय नागरिक रशियामध्ये राहतात? तसेच भारतीय रशियात जाऊन प्रामुख्याने कोणतं काम करतात हे आपण जाणून घेऊया.

भारतातून विदेशात जाणारे लोक जास्त करून नोकरी करणारे असतात. पण, रशियाबाबत थोडं वेगळं समीकरण आहे. रशियामध्ये जाणारे अनेक भारतीय त्याठिकाणी प्रामुख्याने व्यवसाय करतात. रशियाने भारताच्या स्वातंत्र्यापासून मजबूत व्यावसायिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक संबंध स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. देशाच्या स्वातंत्र्यापासूनच भारत आणि रशियातील संबंध चांगले राहिले आहेत.

pm Modi And Putin
France Election 2024: फ्रेंच निवडणुकीत त्रिशंकू संसदेची शक्यता, एक्झिट पोलमध्ये डावी आघाडी वरचढ

विदेश मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार, रशियामध्ये ६२८२५ भारतीय राहतात. यामध्ये ६०१७२ एनआरआय, २६५३ भारतीय वंशाचा लोकांचा समावेश होतो. याशिवाय, भारतीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी रशयामध्ये जात असतात. रिपोर्टनुसार, याठिकाणी जवळपास १५००० भारतीय विद्यार्थी आहेत. ते प्रामुख्याने वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. याआधी चीन आणि युक्रेनमध्ये लोक वैद्यकीय शिक्षणासाठी जात होते. पण, आता त्यांचा ओढा रशियाकडे वाढला आहे.

रशियामध्ये विद्यार्थी का जात आहेत?

सुरक्षितता, व्हिसा सहज मिळणे आणि इंग्रजीमध्ये शिक्षण यामुळे भारतीय विद्यार्थी रशियाला पसंती देत आहेत. याशिवाय, रशिया कमी खर्चामध्ये जगभरातील विद्यार्थ्यांना चांगले वैद्यकीय शिक्षण देते असं सांगितलं जातं.

pm Modi And Putin
France Election: फ्रान्समध्ये निकालाआधी हिंसा उसळली! अनेक ठिकाणी जाळपोळ; 30 हजार सैनिक तैनात

कोणत्या क्षेत्रात भारतीय आहेत?

व्यवसाय करण्यासाठी आणि फार्मास्युटिकल कंपनीत काम करण्यासाठी भारतीय मोठ्या प्रमाणात रशियात जातात. याशिवाय बांधकाम क्षेत्र, तंत्रज्ञान, फायनान्स, मॅन्युफॅक्चरिंग आणि एनर्जी सेक्टरमध्ये भारतीय काम करत आहेत. भारतीयांना रशियामध्ये काम करण्यासाठी वर्क व्हिसा, बिझनेस व्हिसा आणि हाय स्किल्ड मायग्रेंड व्हिसा मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.