भारताच्या 'या' उदारतेनं तालिबानला आनंद झालाय.
भारतानं (India) शुक्रवारी युद्धग्रस्त अफगाणिस्तानला (Afghanistan) 'मानवतावादी' मदतीचा भाग म्हणून दोन टन जीवनरक्षक औषधांची खेप पाठवलीय. परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, जीवरक्षक औषधांची ही खेप काबूलमधील इंदिरा गांधी रुग्णालयाच्या (Indira Gandhi Hospital Kabul) अधिकार्यांना मदतीअंतर्गत सुपूर्द करण्यात आलीय. मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलंय की, अफगाणिस्तानातील लोकांना चालू असलेल्या मानवतावादी मदतीचा एक भाग म्हणून, भारतानं आज तिसर्या खेपेत दोन टन जीवनरक्षक औषधं अफगाणिस्तानला पाठवली आहेत, असं सांगितलं.
भारताच्या या उदारतेनं तालिबानला (Taliban) आनंद झालाय. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद (Jabiullah Mujahid) यांनी ट्विट करून याचं स्वागत केलंय. मुजाहिद यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, भारताच्या या मानवतावादी मदत आणि सहकार्याबद्दल आभारी आहोत, असं त्यांनी नमूद केलंय. परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, अफगाणिस्तानमधील लोकांशी विशेष संबंध सुरू ठेवण्यासाठी आणि त्यांना मदत देण्यासाठी भारत नेहमी कटिबद्ध असेल. आम्ही अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेद्वारे (WHO) अफगाणिस्तानला अँटी-COVID-19 लसीचे 5,00,000 डोस आणि 1.6 टन वैद्यकीय मदत पुरवलीय, असं मंत्रालयानं म्हटलंय. येत्या आठवड्यात, आम्ही अफगाणिस्तानला औषधं आणि अन्नधान्यांसह मानवतावादी मदतीची अधिक खेप पुरवत आहोत, असंही ते म्हणाले.
अशरफ गनी (Ashraf Ghani) सरकारनं भारतातील अफगाण राजदूत म्हणून नियुक्त केलेले फरीद मामुंदझाई यांनी मदतीसाठी नवी दिल्लीचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विट केलंय की, अफगाण लोकांना आवश्यक मानवतावादी मदत पुरवल्याबद्दल भारताचं आभार. 2 टन अत्यावश्यक जीवनरक्षक औषधांसह वैद्यकीय मदतीची तिसरी खेप आज काबूल येथील इंदिरा गांधी रुग्णालयात पोहोचलीय. अफगाणिस्तानला अशा पुरवठ्याची नितांत गरज आहे, असं त्यांनी म्हंटलंय. डिसेंबरमध्ये भारतानं अफगाणिस्तानला 1.6 मेट्रिक टन वैद्यकीय मदत पुरवलीय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.