ISRO : अवकाश क्षेत्रात भारताची दमदार पावले; ‘न्यूयॉर्क टाइम्स’कडून कौतुक

भूराजकीयदृष्ट्या अमेरिकेसाठीही प्रबळ सहकारी
india space research technology rocket launch apj abdul kalam isro new york times article world’s space business
india space research technology rocket launch apj abdul kalam isro new york times article world’s space businesssakal
Updated on

न्यूयॉर्क : अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भारतात प्रचंड वेगाने प्रगती होत असून या क्षेत्रात मोठा बदल घडवून आणण्याची त्याची क्षमता आहे, असे म्हणत ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने भारताच्या महत्त्वाकांक्षी अवकाश कार्यक्रमाचे कौतुक केले. अवकाश क्षेत्रात भारत दमदार पावले टाकत असून चीनच्या तोडीने तो प्रगती साधू शकतो, असेही या वृत्तपत्रातील लेखात म्हटले आहे.

‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये ‘द सरप्रायझिंग स्ट्रायव्हर इन द वर्ल्ड्‌स स्पेस बिझनेस’ या शीर्षकाखाली लेख प्रसिद्ध झाला असून त्यात अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भारतात होत असलेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आहे.

‘‘भारताने १९६३ मध्ये प्रथमच रॉकेटचे प्रक्षेपण केले, त्यावेळी तेव्हा गरीब असलेल्या देशाला जगातील सर्वांत आधुनिक तंत्रज्ञानाची आस निर्माण झाली होती. ज्या रॉकेटचे सुटे भाग सायकलवरून प्रक्षेपण केंद्रावर नेले गेले होते, त्याच रॉकेटने त्यावेळी एक छोटा पेलोड (वजन) पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १२४ मैल उंचीपर्यंत नेला होता.

india space research technology rocket launch apj abdul kalam isro new york times article world’s space business
Team India Coach : टीम इंडियाला मिळणार नवीन कोच, 'या' दौऱ्यापासून होणार नियुक्ती

या क्षेत्रात अमेरिका आणि सोव्हिएत महासंघाने साधलेल्या प्रगतीचा टप्पा गाठण्यासाठी भारत धडपडत होता; आज मात्र हा देश दमदार पावले टाकत आहे,’’ असे लेखामध्ये म्हटले आहे. भारतात अवकाश तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडित १४० नोंदणीकृत स्टार्ट अप असून त्याद्वारे प्रचंड संशोधन होत आहे.

त्यामुळे हा देश या क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या तयारीत आहे, अशी नोंदही लेखात घेण्यात आली आहे. कोरोना संसर्गकाळ सुरु होण्यापूर्वी भारतात अवकाश क्षेत्राशी निगडित पाच स्टार्ट अप कंपन्या होत्या, आता त्यांची संख्या १४० पर्यंत गेली आहे.

‘न्यूयॉर्क टाइम्स’ने भारताच्या मंगळयान मोहिमेची थट्टा करणारे व्यंग्यचित्र प्रसिद्ध केले होते. त्याच वृत्तपत्राला आज भारताच्या प्रगतीची दखल घ्यावी लागल्याचे विश्र्लेषकांनी सांगितले.

india space research technology rocket launch apj abdul kalam isro new york times article world’s space business
Hindi in America : अमेरिकेतील शाळांमध्ये शिकवली जाणार हिंदी भाषा; १०० हून अधिक लोकप्रतिनिधींचा बायडेन यांना प्रस्ताव

भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याची दखल

एक वैज्ञानिक शक्ती म्हणून भारत स्वत:चे स्थान निर्माण करत असल्याचे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यात दोन्ही देशांनी अवकाश क्षेत्रात अधिक सहकार्य करण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख लेखात करण्यात आला आहे.

अवकाश अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी दोन्ही देशांतील खासगी कंपन्यांनाही यात सहभागी केले जाणार आहे. अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भारत हा चीनला टक्कर देऊ शकेल, असा अमेरिकेला विश्‍वास असल्याचे लेखात म्हटले आहे.

india space research technology rocket launch apj abdul kalam isro new york times article world’s space business
Voilence in America: अमेरिकेत गोळीबार सत्र सुरुच, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ३ मृत्युमुखी

भारताचे भूराजकीय स्थान ही त्यांची मोठी ताकद आहे. रशिया आणि चीन हे कमी दरांत अवकाश प्रक्षेपण सेवा पुरवितात. मात्र, युक्रेन युद्धामुळे स्पर्धक म्हणून रशिया बाद झाला आहे. रशियामार्फत उपग्रह सोडणाऱ्या काही कंपन्या भारताकडे जात आहेत. अमेरिकाही भविष्यात चीनऐवजी भारतालाच प्राधान्य देण्याची शक्यता आहे.

- न्यूयॉर्क टाइम्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.