नवी दिल्ली : पाच मोठ्या देशांचा समूह BRICS (ब्राझीलल-रशिया-भारत-चीन-दक्षिण आफ्रीका) देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक घेतली. यावेळी भारताने रशियासमोर युक्रेन युद्धाचा मुद्दा प्रामुख्यानं उचलून धरला. युक्रेन युद्धामुळे (Ukraine Russia War) अन्नधान्याच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. त्याचा फटका विकसनशील देशाला बसत आहे. या किंमती कमी करण्याची गरज आहे, असं एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत म्हटलं.र
रशियाएकीकडे भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरू आहे, तर दुसरीकडे रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. अशावेळी एस. जयशंकर यांनी केलेलं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे. BRICS समूहातील देशांनी नेहमीच समानता, अखंडता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला अधिक महत्व दिलं आहे. त्यामुळे आपल्या मुल्यानुसार या समूहाने काम करायला पाहिजे. BRICS देशांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणेबाबात जे काही धोरण आहे त्याचं समर्थन करायला पाहिजे, असंही जयशंकर म्हणाले.
जयशंकर यांनी या बैठकीत पाकिस्तानला देखील अप्रत्यक्ष इशारा दिला. आपल्या समूहातील देशांनी दहशतवादाला जागा न देता त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करायला पाहिजे. आम्ही अशा दहशतवाद्यांना तोंड देण्यास समर्थ असल्याचे ते म्हणाले. यावेळी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी, ब्राझिलचे कार्लोस अल्बर्टो फ्रेंको फ्रांका, रशियाचे सर्गेई लावरोव आणि दक्षिण आफ्रिकाचे ग्रेस नलेदी उपस्थित होते. चीनकडून या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
दरम्यान, रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर झालेल्या बैठकीत भारतानं प्रत्येकवेळी तटस्थ भूमिका घेतली. पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादल्यानंतर संयुक्त राष्ट्रांची एक बैठक झाली त्यावेळी देखील भारत तटस्थ राहिला. पण, आज एस. जयशंकर यांनी युद्धाबाबत वक्तव्य केलं आहे. यापूर्वी देखील युक्रेनमध्ये सापडलेल्या सामूहिक मृतदेहांची चौकशी करण्याची मागणी भारतानं केली होती. तसेच या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.