'काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा, तुम्हाला...', भारतानं चीनला सुनावलं

India Warned China on Kashmir
India Warned China on Kashmire sakal
Updated on

नवी दिल्ली : चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी (China ) यांनी पाकिस्तानमधील इस्लामिक सहकार्य संघटनेच्या (China Meeting OIC) बैठकीत जम्मू-काश्मीरबाबत एक वक्तव्य केलं होतं. मात्र, हे वक्तव्य अनावश्यक असल्याचं सांगत भारतानं फेटाळलं आहे. जम्मू-काश्मीर केंद्रशासीत प्रदेशासंबंधित बाबी देशातील अंतर्गत बाबी आहेत. चीनसह इतर देशांना जम्मू-काश्मीवर भाष्य करण्याचा अधिकार नाही, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं चीनला सुनावलं. (India Warned China on Kashmir)

India Warned China on Kashmir
जगात शांतता कायम राखण्यासाठी भारत करू शकेल नेतृत्व!

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. काश्मीरच्या मुद्द्यावर इस्लामिक मित्रांनी दिलेली हाक आम्ही ऐकली आहे. चीनची देखील अशीच आकांक्षा आहे, असं वक्तव्य चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यांनी इस्लामिक संघटनेच्या बैठकीत केलं होतं. चीन आणि इस्लामिक देशाचे संबंध आणखी मजबूत होतील. आम्ही या देशासोबतचे संबंध आणखी दृढ करू, असं वांग यी या बैठकीत म्हणाले होते.

काश्मीरबाबतच्या चीनच्या वक्तव्यावर भारताकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भारत देशांतर्गत बाबींवर सार्वजनिकपणे मत व्यक्त करणे टाळतो, हे इतर देशांनी समजून घ्यायला पाहिजे. उद्घाटन सत्रातील भाषणादरम्यान चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारताचा केलेला उल्लेख अनावश्यक होता. जम्मू काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यामुळे चीनसह इतर देशांना जम्मू-काश्मीरवर भाष्य करण्याचा अधिकार नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते बागची यांनी सांगितलं.

चीनने परराष्ट्र मंत्री वांग हे भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप दोन्ही बाजूंनी या दौऱ्याबाबत स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. त्यानंतर आता भारतानं चीनला सुनावलं आहे. त्यामुळे आता वांग यांचा दौरा होणार की नाही? याबाबत देखील शंका निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.