Bastille Day Parade 2023: बॅस्टिल डे परेड निमित्त भारताच्या वायुसेनेच्या तुकडीचा सराव, राफेलही देणार फ्लायपास्ट

PM Modi Guest of Honour: बॅस्टिल डे परेड या कार्यक्रमाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे असणार आहेत.
IAF contigent in France
IAF contigent in FranceEsakal
Updated on

IAF Contigent practice in France: भारताच्या वायुसेनेची एक तुकडी फ्रान्समध्ये बॅस्टिल डे परेडमध्ये सहभागी होणार आहे. त्याच्यासाठी भारतीय वायुसेनेची ६८ सदस्यांची तुकडी परेडचा सराव करताना दिसली. या तुकडीचे सराव करातानाचे फोटो समोर आले आहेत.

भारतीय वायुसेनेच्या या तुकडीचे नेतृत्व स्वॉड्रन लीडर सिंधू रेड्डी या करणार आहेत. यंदाच्या बॅस्टिल डे परेडसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेस्ट ऑफ ऑनरचा मान मिळाला आहे, म्हणजेचं नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे आहेत.

बॅस्टिल डे परेडच्या दिवशी भारतीय वायुसेनेबरोबरच भारताच्या तिनही दलांतील मिळून २६९ सदस्य फ्रान्सच्या सैनिकांसोबत परेड करतानाचा ऐतिहासिक क्षण १४ जुलैला बघायला मिळेल. त्याचबरोबर भारतीय वायुसेनेतील ४ राफेल चॅम्प्स एलिसीच्या वरुन फ्लायपास्ट करणार आहेत.

राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांच्या काळात बॅस्टिल डे परेडला मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे नरेंद्र मोदी हे पहिले परदेशी पाहुणे असतील. याआधी २००९मध्ये भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंह हे बस्टिल डे परेडला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.(Latest Marathi News)

IAF contigent in France
Chhagan Bhujbal: शरद पवारांच्या माफीनाम्यावर भुजबळांचा सवाल, 'पवार साहेब तुम्ही किती ठिकाणी माफी मागणार आणि..'

बॅस्टिल डे का साजरा केला जातो?

बॅस्टिल पॅरिसमधील एका मध्ययुगीन किल्ल्याच नाव आहे, ज्याचं रुपांतर तरुंगाता करण्यात आलं होतं. सुरुवातीला या वास्तुची निर्मीती शहराचे पूर्वेकडील असणाऱ्या दरवाजाचे रक्षण करण्यासाठी करण्यात आली होती. त्यानंतर १७व्या आणि १८व्या शतकात राज्यातील महत्वाच्या लोकांना कैद करुन ठेवण्यासाठी या जागेचा वापर केला जाऊ लागला. (Latest Marathi News)

फ्रान्सच्या क्रांतिकारकांच्या जमावाने १४ जुलै,१७८९ या दिवशी या किल्ल्यावर हल्ला केला आणि संधी मिळताच ७ कैद्यांना सोडवले. ही घटना फ्रेंच राज्यक्रांतीचे प्रतिक म्हणून ओळखली जाते.

IAF contigent in France
Uddhav Thackeray News : शरद पवारांनंतर ठाकरे देखील मैदानात! संजय राठोडांच्या बालेकिल्ल्यात घेणार सभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.