Indian businessman Gupta Brothers arrested in UAE
Indian businessman Gupta Brothers arrested in UAEesakal

दक्षिण आफ्रिकेत भ्रष्टाचाराचा आरोप; भारतीय उद्योगपतींना यूएईमध्ये अटक

Published on
Summary

गुप्ता बंधू 24 वर्षांपूर्वी सहारनपूरहून व्यवसायाच्या शोधात दक्षिण आफ्रिकेत गेले होते.

अबू धाबी : दक्षिण आफ्रिकेत (South Africa) भ्रष्टाचाराचे आरोप असलेले भारतीय उद्योगपती गुप्ता ब्रदर्स (Gupta Brothers) यांना संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) अटक करण्यात आलीय. दक्षिण आफ्रिकेच्या सरकारनं सोमवारी सांगितलं की, संयुक्त अरब अमिरातमधील (UAE) कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांनी गुप्ता कुटुंबातील राजेश गुप्ता (Rajesh Gupta) आणि अतुल गुप्ता (Atul Gupta) यांना अटक केली. या दोघांविरुद्ध इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. सध्या दक्षिण आफ्रिकेचं सरकार दोघांच्याही प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहे.

गुप्ता बंधू 24 वर्षांपूर्वी सहारनपूरहून व्यवसायाच्या शोधात दक्षिण आफ्रिकेत गेले होते. तिथं त्यांनी चांगला जम बसवला आणि त्यांचा व्यवसाय फळाला आला. त्यानंतर ते देशातील पहिल्या दहा श्रीमंत व्यावसायिक कुटुंबांपैकी एक बनले. पण, माजी राष्ट्रपती झुमा यांच्या जवळ असल्याचा आणि राजकीय फायद्यासाठी त्यांचा व्यवसाय चालवल्याचा आरोप त्यांच्यावर नेहमीच केला जायचा.

Indian businessman Gupta Brothers arrested in UAE
एटीएस-बीएसएफची मोठी कारवाई, पाकिस्तानी बोटीतून तब्बल 250 कोटींचं हेराॅइन जप्त

दक्षिण आफ्रिकेतील भ्रष्टाचाराबाबत एका अहवालानं पुष्टी केलीय की, गुप्ता ब्रदर्सच्या मालकीचं 'द न्यू एज' हे वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्रानं सरकारी मालकीच्या उद्योगांमधून कोट्यवधी रुपये लाटले होते. शिवाय, माजी राष्ट्रपती जेकब झुमा यांचीही मदत केली होती, असा आरोपही त्यांच्यावर आहे. मूळचे उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) सहारनपूर येथील अजय, अतुल आणि राजेश या तीन गुप्ता बंधूंनी टीएनए सुरू केला होता, जो तेव्हापासून बंद आहे. हे तिघं भाऊ सध्या दुबईत राहत होते. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रत्यार्पणाची विनंती केलीय, जेणेकरून त्यांच्यावरील गुन्हेगारी आरोपांची सुनावणी होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()