सिंगापूरमधील एका सुपरमार्केटने भारतीय वंशाच्या मुस्लिम जोडप्याला रमझानच्या काळात मोफत देण्यात येणारे खाद्यपदार्थ खाण्यापासून रोखलं. त्यानंतर या सुपरमार्केटने माफीही मागितली आहे.
जबर शालीह आणि त्यांची पत्नी फराह यांनी सांगितलं की, ९ एप्रिल रोजी ते त्यांच्या नेहमीच्या किराणा मालाच्या दुकानात खरेदी करत होते. तेव्हा नॅशनल ट्रेड्स युनियन कॉंग्रेस (NTUC) द्वारे चालवल्या जाणार्या सुपरमार्केटमधील एका पुरुष कर्मचाऱ्याने त्यांना तिथल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलपासून लांब जायला सांगितलं.
जबर भारतीय आहे, तर त्याची पत्नी फराह भारतीय-मलेशियन वंशाची आहे. फराहने रविवारी एका फेसबुक पोस्टमध्ये हा अपमान असल्याचं म्हटलं आहे. या गोष्टीचा अनेकांनी कमेंट्स करत निषेध केला आहे.
जबरने सोमवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, त्यांच्या पत्नीने त्यांना या उपक्रमाबद्दल सांगितल्यानंतर त्यांनी सुपरमार्केटमधील ‘इफ्तार बाइट्स स्टेशन’ पाहण्याचा निर्णय घेतला आहे. फेअरप्राईस ग्रुपने २३ मार्च रोजी इफ्तार बाइट्स स्टेशन सुरू केले, रमजानच्या महिन्याभराच्या कालावधीत मुस्लिम ग्राहकांना ६० आउटलेटवर स्नॅक्स किंवा खजूरांसह मोफत पेये ऑफर केली.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून, मुस्लिम ग्राहकांना इफ्तारच्या ३० मिनिटांपूर्वी आणि नंतर कॅनमधील पेय आणि रमझानमध्ये संध्याकाळच्या नमाजानंतर जेवण यासारखे अल्पोपहार दिले जातात. हे सुपरमार्केटमधील टेबलवर ठेवलेले असतात. ग्राहकांसाठिी इथे बोर्डसही लावले जातात.
“मी फक्त बोर्डवर काय आहे ते वाचण्यासाठी गेलो कारण मला वाटले की हे सामान्यतः NTUC द्वारे चांगले उपक्रम राबवले जातात. जेव्हा मी ते वाचायला सुरुवात केली तेव्हा NTUC मधील हा कर्मचारी माझ्याकडे आला आणि त्याने मला 'नो इंडिया' सांगितले ... आणि मी 'काय'?,” असं विचारलं तर “तो म्हणाला ‘नो इंडिया, ओन्ली मलय’ . हा प्रकार विचित्र आहे, असंही आपण म्हणाल्याचं जबर सांगतात.
जबरने पुरुष कर्मचाऱ्याला त्याचा अर्थ विचारला, तेव्हा त्या कर्मचाऱ्याने सांगितलं की हे खाद्यपदार्थ भारतीय लोकांसाठी नाहीत. जबरने नंतर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की मुस्लिम भारतीय समुदायातून येऊ शकतात. पण त्यानंतर कर्मचाऱ्याने त्याला सांगितलं की वरिष्ठांकडून तशा सूचना मिळाल्या आहेत.
“आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतो आणि या घटनेबद्दल माफी मागू इच्छितो. त्यानंतर आम्ही आमच्या कर्मचार्यांचेही त्यानुसार समुपदेशन केले आहे. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की महिनाभर चालणाऱ्या रमजान कालावधीत सर्व मुस्लिम ग्राहकांना इफ्तार पॅक मोफत दिले जातात,” असे सुपरमार्केटने या प्रकारानंतर स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.