Indian Girl Killed in Australia: ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थीनीला केलं प्रियकरानं जिवंत दफन! घटना ऐकून व्हाल सुन्न

Indian Girl Killed in Australia:ऑस्ट्रेलियामधून एक प्रकरण समोर आलयं, जिथे ऑस्ट्रेलियामध्ये राहून नर्सिंगचा अभ्यास करणाऱ्या जसमीन कौर नावाच्या मुलीला तिच्याच पूर्व प्रियकर तारिकजोत सिंह याने जिवंत जमीनीत गाडलंय.
crime against women
crime against women Esakal
Updated on

Jasmin kaur Murder: एखादा व्यक्ती जेव्हा चुकीचं काम करतो, तेव्हा त्याला त्या चुकीची शिक्षा भोगावीचं लागते. ऑस्ट्रेलियामधून एक प्रकरण समोर आलयं, जिथे ऑस्ट्रेलियामध्ये राहून नर्सिंगचा अभ्यास करणाऱ्या जसमीन कौर नावाच्या मुलीला तिच्याच पूर्व प्रियकर तारिकजोत सिंह याने जिवंत जमीनीत गाडलंय.

जसमीनने त्याच्यासोबत नात्यात राहण्यास नकार दिला होता म्हणून तारिकजोतने बदला घेण्याच्या भावनेने इतके अमानुष कृत्य केलं. आता या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. आरोपी तोरिकजोतला फेब्रुवारीमध्ये दोषी ठरवण्यात आलं होते.

अपहरण करुन ६०० किलोमीटर नेलं

एका अहवालानुसार, तारिकजोतने २१ वर्षीय जसमीन कौरचे ५ मार्च, २०२१ या दिवशी तिच्या ऍडिलेड येथील कामाच्या ठिकाणाहून अपहरण केलं. त्यानंतर तिला गाडीच्या डिक्कीत टाकून चार तासांपर्यंत फिरवलं. त्यानंतर तिला तिच्या कामाच्या ठिकाणापासून ६४४ किलोमीटर लांब असलेल्या दक्षिण ऑस्ट्रेलिया राज्यातील सुदूर फ्लिंडर्स रेंजमध्ये आणले आणि तिथे तिला जिवंत गाडलं.

आरोपी तारिकजोत सिंह याला मार्च, २०२१मध्ये हत्येच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले. मात्र, बुधवारी (दि.५जुलै) सुप्रिम कोर्टोने शिक्षा सुनावताना त्याने केलेल्या भयानक कृत्याचे विश्लेषण सर्वांना ऐकवण्यात आलं.(Latest Marathi news)

crime against women
Bachchu Kadu : याला काय अर्थय! अजित पवारांच्या बंडानंतर बच्चू कडू संतापले; थेट बोलले...

तारिकजोतने जसमीनची हत्या करण्यासाठी आपल्या खोलीमित्राकडून पैसे उधार घेतल्याची माहिती फिर्यांदींकडून समजली. त्यांनी सांगितले की, ज्या पद्धतीने जसमीनची हत्या करण्यात आली, ही अत्यंत क्रूर गोष्ट होती. (Latest Marathi News)

न्यायालयात आईने ऐकली आपल्या मुलीच्या हत्येची सत्यता

फिर्यादी कारमेन माटेओ म्हणाले की हत्या सामान्य नव्हती, जसमीनला खूप त्रास सहन करावा लागला असेल. माटेओ म्हणाले की तिला झालेल्या त्रासाचा अंदाज या गोष्टीवरुन लावला जाऊ शकतो की जेव्हा तिला मातीत गाडलं असेल, तेव्हा तिच्या गळ्यात माती जात असेल आणि तिला श्वास घेण्यात खूप अडचण होत असेल. शिक्षेसंबंधी युक्तिवाद ऐकताना तिचे आई-वडील देखील उपस्थित होते.

crime against women
Bhujbal On retirement: शरद पवारांना रिटायर व्हा म्हणणारे अजित पवार ठरवणार भुजबळांची रिटायरमेंट...

आरोपीने कबूल केला आपला गुन्हा

तारिकजोतने जसमीनला आधी खूप वेळा धमकीयुक्त संदेश पाठवले होते, असे पोलिसांच्या तपासातून समोर आलं. तारिकजोतने आधी हत्येचा आरोप फेटाळला होता आणि म्हणाला होता जसमीनने आत्महत्या केली होती आणि त्याने तिचे शरीर गाडलं.

मात्र, वर्षांच्या सुरुवातीला खटला सुरु होण्याआधी त्याने आपल्या गुन्ह्याची कबूली दिली. तो अधिकाऱ्यांना जसमीनला गाडलेल्या ठिकाणी घेऊन गेला, जिथे त्यांना जसमीनचे बूट,चष्मा आणि कामाच्या नावाचा बॅज गोष्टी टायमध्ये बांधलेल्या मिळाल्या. (Latest Marathi News)

crime against women
'अजित पवार मराठा पण फडवणीस भारी'; 'त्या' खासदाराची Audio Clip Viral

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.