साहित्य जगतातील प्रतिष्ठेचा बुकर पुरस्कार गीतांजली श्री यांच्या कादंबरीला जाहीर

५०,००० पाउंड रकमेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारं हे पहिलं हिंदी पुस्तक बनलं आहे
geetanjali shree
geetanjali shree sakal
Updated on

भारतीय हिंदी लेखिका गीतांजली श्री यांच्या 'रेत समाधी' या कादंबरीचे इंग्रजी अनुवादन 'Tomb of sand'ला प्रतिष्ठीच असा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २०२२ मिळाला आहे. डेजी रॉकवेल यांनी या पुस्तकाचे इंग्रजी भाषेत अनुवादन केले होते. ५०,००० पाउंडच्या या साहित्यिक पुरस्कारासाठी आणखी पाच अनुवादित पुस्तकं स्पर्धेत होती. महत्वाचं म्हणजे हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारं हे पहिलं हिंदी पुस्तक बनलं आहे.

geetanjali shree
सुप्रिया सुळेंविरोधातील 'ते' विधान चंद्रकांत पाटलांना भोवलं; महिला आयोगाची नोटीस

रेत समाधी या कादंबरीची स्टोरी अंगावर शाहरे आणणारी आहे, जी ८० वर्षाच्या एका वृद्ध विधवा महिलेवर आधारित आहे. जिने भारत आणि पाकिस्तान फाळणीच्या वेळी १९४७ चे आपले अनुभव मांडले आहेत. फाळणी आधी आणि फाळणी नंतरच्या काळातल भारताचं दृश्य मांडलं गेलं आहे. रेत समाधी या मूळ हिंदी पुस्तकाचं प्रकाशन राजकमल प्रकाशनने केल आहे, तर 'Tomb of sand'च इंग्रजी अनुवादन अॅक्सेस प्रेसने प्रकाशित केलं होत.

geetanjali shree
हरयाणाचे माजी CM ओमप्रकाश चौटालांना चार वर्षांचा तुरुंगास

पुरस्कार मिळाल्यानंतर भारतीय लेखिका गीतांजली श्री यांनी म्हंटल कि, मी कधी विचार सुद्धा केला नव्हता कि, माझ्या कादंबरीला एवढा मोठा पुरस्कार मिळेल. आपल्या भारतात कादंबरीला भरभरून प्रतिसाद मिळाला. पण इंग्रजी अनुवादाला सुद्धा तितकाच प्रतिसाद मिळेल, ,भारताबाहेरच्या लोकांनादेखील ते आवडेल आणि एवढा मोठा पुरस्कार मिळेल, याचा स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. मला अजूनही आश्चर्य वाटतंय, पण मी खूप खुश आहे.

geetanjali shree
पोलीसांवर बंदूक रोखलेल्या 'त्या' शाहरूखचं ग्रॅंड वेलकम, व्हिडीओ व्हायरल

खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील गीतांजली श्री यांचं आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हंटल कि, 'यावर्षी साहित्य जगतातील प्रतिष्ठेच्या बुकर पुरस्कारासाठी गीतांजली श्री यांच्या 'रेत समाधी' या कादंबरीचा अनुवाद 'टॉम्ब ऑफ सॅंड' ची निवड झाली आहे.भारतीय भाषांना मिळालेला हा गौरव आहे. या आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल गीतांजली श्री यांचे हार्दिक अभिनंदन'

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराबद्दल सांगायचं झालं तर, ब्रिटन आणि आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या अनुवादित फ्रिक्शन गोष्टींसाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. फ्रिक्शन कन्टेन्टकला प्रोत्साहन देणं हे या पुरस्कारामागचे उद्देश आहे. १९६९ साली बर्निस रुबेन्स यांच्या 'द इलेक्टेड मेम्बर' या कादंबरीला पहिला पुरस्कार देण्यात आला होता. ५०,००० पाउंड अशी या पुरस्काराची सध्याची बक्षीस रक्कम आहे. यंदाच्या पुरस्काराच्या बक्षीसाची रक्कम लेखिका गीतांजली श्री आणि डेजी रॉकवेल यांच्यात वाटून घेण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.