ब्रिटनमध्ये केरळमधील एका व्यक्तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. केरळचा रहिवासी असलेला साजू चेलावालेल याला सोमवारी पूर्व इंग्लंडमधील नॉर्थम्प्टन क्राउन कोर्टाने ही शिक्षा सुनावली.
आरोपी साजू चेलावालेल याने पत्नी अंजू अशोके आणि मुले जीवा साजू (6) आणि जान्हवी साजू (4) यांची हत्या केली आहे. याची त्याने कबुली देखली दिली आहे. यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान न्यायाधीश एडवर्ड पेपरॉल यांनी अंजूच्या मृत्यूच्या वेळेची एक ऑडिओ रेकॉर्डिंग पुरावा म्हणून ग्राह्य धरली आणि शिक्षा सुनावली आहे.
न्यायाधीश म्हणाले की, जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीचा जीव घेत होता तेव्हा तुमच्या मुलांना त्यांच्या आईसाठी रडताना ऐकू येत होते. हे स्पष्ट आहे की त्यांनी काय घडत आहे ते ऐकले आणि दोन्ही मुलांना माहित होते की तुम्ही तिला मारत आहात. हे भयंकर आहे.
१५ डिसेंबर २०२२ रोजी, आपत्कालीन सेवांना नॉर्थम्प्टनमधील एका भारतीय कुटुंबाकडून एक महिला आणि दोन मुले गंभीर जखमी झाल्याची तक्रार आली. बराच वेळ घराबाहेर उभे राहिल्यानंतर, नॉर्थम्प्टनशायर पोलिसांनी सांगितले की त्यांच्या अधिकार्यांनी आत जाण्यासाठी दरवाजा तोडला. तेव्हाच साजू चेलावालेल चाकू हातात धरून असल्याचे दिसले.
पोलिसांनी त्याला चाकू फेकण्यास सांगितले मात्र तो ओरडत होता आणि हाताने चाकू फिरवत होता आणि म्हणत होता की मला गोळी मारा. मात्र, बऱ्याच कालावधीनंतर त्याला अटक करण्यात आली.
अंजू जागीच मृतावस्थेत आढळून आली आणि काही वेळाने दोन्ही मुलांनाही मृत घोषित करण्यात आले. लीसेस्टर रॉयल इन्फर्मरी येथे फॉरेन्सिक पोस्टमॉर्टेम करण्यात आले आणि तिघांचाही गुदमरून मृत्यू झाल्याचे उघड झाले. (latest marathi news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.