Lebanon Attack on Israel: हमास पाठोपाठ लेबनॉनचाही इस्राइलवर हल्ला! एका भारतीयाचा मृत्यू, तर दोन जण जखमी

Lebanon Attack on Israel: इस्राइलच्या उत्तर सीमेवरील मार्गालियट समुदाया जवळील बागेत लेबनॉनमधून डागलेल्या क्षेपणास्त्रामुळे केरळमधील एका भारतीयाचा मृत्यू झाला, अशी माहिती पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे.
Lebanon Attack on Israel
Lebanon Attack on IsraelEsakal
Updated on

Lebanon Attack on Israel: इस्राइल-हमास युद्धात लेबनॉनमधून सोमवारी झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. इस्राइलच्या उत्तर सीमेवरील मार्गालियट समुदाया जवळील एका बागेत लेबनॉनमधून डागण्यात आलेले क्षेपणास्त्र आदळल्याने केरळमधील एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले, अशी माहिती पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे.

लेबनॉन आणि उत्तर इस्राइलमध्ये हिजबुल्लाह अतिरेक्यांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात सोमवारी एक भारतीय नागरिक ठार झाला आणि सात जण जखमी झाले, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. इस्राइलच्या चॅनल 12 टीव्हीच्या बातमीनुसार, क्षेपणास्त्र मार्गालियट समुदायातील एका बागेवर आदळले, त्यात आठ भारतीय कामगारांचा मृत्यू झाला.

Lebanon Attack on Israel
Controversial Statement of TMC MLA: 'राम मंदिर अपवित्र ठिकाण, कोणीही अयोध्येला जाऊ नये...'; टीएमसी आमदाराचे वादग्रस्त विधान, Video Viral

इस्राइलच्या मॅगेन डेव्हिड ॲडोम बचाव सेवेने एका निवेदनात म्हटले आहे की, या हल्ल्यात दोन भारतीय नागरिक गंभीर जखमी झाले असून इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली लष्कराने या क्षेपणास्त्र हल्ल्याला रणगाडे आणि तोफखान्यातून गोळीबार करून चोख प्रत्युत्तर दिले आहे. गाझा पट्टीमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्राइल-लेबनॉन सीमेवर 150 दिवसांच्या लढाईतील हा हिंसाचार सर्वात ताजा आहे.

Lebanon Attack on Israel
Lok sabha Election: लालकृष्ण अडवाणी विरुद्ध राजेश खन्ना लोकसभा लढत; कोण जिंकलं? जाणून घ्या रंजक किस्सा

लेबनॉनच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला पटनिबिन मॅक्सवेल हा केरळमधील कोल्लमचा रहिवासी होता. पीटीआयने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, झिव हॉस्पिटलमध्ये त्याच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात बुश जोसेफ जॉर्ज आणि पॉल मेलविन जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, "चेहऱ्यावर आणि शरीराला झालेल्या दुखापतीमुळे जॉर्जला पेटा टिकवा येथील बेलिन्सन रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती आता सुधारत असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. दुसरा भारतीय मेल्विन यालाही किरकोळ दुखापत झाल्याने उत्तर इस्राइलमधील झिव्ह हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तो केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील रहिवासी आहे. यापूर्वी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इस्रायली लष्करात कार्यरत असलेल्या भारतीय वंशाच्या सैनिकाचा मृत्यू झाला होता.

Lebanon Attack on Israel
Kolkata News : आयआयटीच्या आवारात फिरा शेअर सायकलवर; प्रदूषण घटवून हरित वाहतुकीला प्रोत्साहनासाठी उपक्रम

भारतातील इस्राइलच्या दूतावासाने याबाबत ट्विट केले आहे की, "शिया दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने येथे बागेची लागवड करणाऱ्या शांततापूर्ण कृषी कामगारांवर केलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू आणि इतर दोन जण जखमी झाले आहेत. इस्रायली वैद्यकीय संस्था पूर्णपणे जखमींच्या सेवेत आहेत. जखमींवर सर्वोत्तम वैद्यकीय कर्मचारी उपचार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.