व्हिसासाठी गेलेल्या महिलेवर भारतीय अधिकारी भडकला
व्हिसासाठी गेलेल्या महिलेवर भारतीय अधिकारी भडकलाgoogle

Viral Video: व्हिसासाठी गेलेल्या महिलेवर भारतीय अधिकारी भडकला

वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे या महिलेला भारतात यायचं होतं.
Published on
Summary

वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे या महिलेला भारतात यायचं होतं.

गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक महिला आपल्या सहकार्‍यासोबत अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासात व्हिसा मिळवण्यासाठी गेली. परंतु तेथील अधिकाऱ्याने रागात त्यांचा अर्ज परत केला. ही घटना महिलेने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भारतीय दूतावासाने आरोपी अधिकाऱ्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

व्हिसासाठी गेलेल्या महिलेवर भारतीय अधिकारी भडकला
Vienna Terror Attack: ऑस्ट्रियाने दिल्लीतील दूतावास केलं बंद

वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे या महिलेला भारतात यायचं होतं. त्यासाठी तिने अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील भारतीय दूतावासात व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज केला. परंतु तेथील भारतीय अधिकारी काही कारणामुळे त्यांच्यावर संतापला आणि त्यांचा अर्ज परत केला. तो त्यांच्यावर ओरडल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे. राकेश कृष्णा सिम्हा नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, भारतीय दुतावासातील एका कार्यालयात एक अधिकारी रागाने बडबडत येतो आणि महिलेने केलेला अर्ज तिला परत करतो. तो अधिकारी रागाच्या भरात त्यांना बरंच काही सुनावतो. महिला आणि तिच्या सोबतचा व्यक्ती सतत अधिकाऱ्याकडे व्हिसासाठीचा अर्ज स्वीकारण्याची विनंती करत आहे. पण तो त्यांचं ऐकत नाही, उलट त्यांच्यावर अजून भडकतो. आपले वडिलांचा मृत्यू झाला असून आपल्याला व्हिसा हवा आहे, असे ती महिला शेवटपर्यंत अधिकाऱ्याला सांगते, पण अधिकारी तिचे म्हणणं ऐकून घेत नाही. परंतु हा अधिकारी महिलेवर का भडकला हे मात्र समजू शकले नाही.

दरम्यान हा व्हिडिओ समोर आल्यानंतर दूतावासातील उच्च अधिकारी सतर्क झाले आहेत. त्यांनी भारतीय दूतावासाच्या अधिकृत ट्विटरवर हँडलवरून ही माहिती दिली आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, 'यासंदर्भात तक्रारीची दखल घेतली आहे. दूतावास जनतेच्या सेवेसाठी उच्च मानकांचे पालन करतो. कॉन्सुल जनरल यांनी स्वत: या प्रकरणाचा आढावा घेतला आहे. दिलेल्या माहितीनंतर संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.