नवी दिल्ली : भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ थर्मन षण्मुगरत्नम हे सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. गुरुवारी त्यांनी सिंगापूरचे नववे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. दोन आठवडे सुरु असलेल्या मतदान प्रक्रियेनंतर त्यांनी मोठा विजय मिळवला, असं वृत्त स्ट्रेट टाईम्सनं दिल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. (Indian origin economist Tharman Shanmugaratnam sworn in as Singapore President)
थर्मन षण्मुगरत्नम (वय ६६) यांचा शपथविधीचा कार्यक्रम गुरुवारी संध्याकाळी पार पडला. यावेळी त्यांना गार्डऑफ ऑनरही देण्यात आला.
थर्मन हे एक नावाजलेले अर्थतज्ज्ञ आणि सरकारी कर्मचारी होते. सिंगापूरच्या मॉनिटरी ऑथरिटीमध्ये त्यांनी प्रामुख्यानं काम केलं आहे. त्यानंतर २००१ मध्ये त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. २०११ ते २०१९ या काळात त्यांनी शिक्षण, अर्थमंत्री म्हणून तसेच उपपंतप्रधान म्हणून काम केलं. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतीक आर्थिक व्यासपीठ आणि संयुक्त राष्ट्रांसहित अनेक जागतीक संघटनांमध्ये प्रमुख पदांवरही त्यांनी काम केलं आहे. (Latest Marathi News)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी थर्मन यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. तसेच भारत-सिंगापूर राजनैतिक सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी भविष्यात आपल्याला थर्मन यांच्यासोबत काम करायला आवडेल, असा मानसंही मोदींनी बोलून दाखवला. (Marathi Tajya Batmya)
सिंगापूरमध्ये भारतीय वंशाचे आत्तापर्यंत दोन राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. यामध्ये सी व्ही देवन नायर, सेल्लापन रामनाथन आणि आता थर्मन षण्मुगरत्नम यांचा समावेश आहे.
सी व्ही देवन नायर हे १९८१ ते १९८५ या काळात सिंगापूरचे तिसरे राष्ट्रपती म्हणून निवडून आले. सन १९२३ मध्ये मलेशियातील मलक्का इथं जन्मलेल्या नायर हे एका रबराच्या बागेत क्लर्क म्हणून काम करणाऱ्या आय व्ही करुणाकरण नायर यांचे पुत्र होते. त्यांचे वडील हे मूळचे केरळ येथील थालास्सेरीचे रहिवासी आहेत.
राजकारणी आणि तामिळ वंशाचे अधिकारी सेल्लापन रामनाथन यांनी पहिल्यांदा सिंगापूरचं राष्ट्राध्यक्षपद भूषवलं. रामनाथन यांनी सन १९९९ मध्ये बेंजामिन शियर्स यांना पराभूत करत सिंगापूरचं राष्ट्राध्यक्षपद पटकावलं होतं. त्यानंतर २०११ पर्यंत ते या पदावर राहिले. सर्वाधिक काळासाठी ते सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष राहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.