Video: अमेरिका भारतीयांसाठी ठरतीये घातक! हैद्राबादच्या विद्यार्थ्यावरील जीवघेण्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर

अमेरिकेत भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. हैद्राबादचा रहिवाशी असलेल्या विद्यार्थ्यावर चार शस्त्रधारी हल्लेखोरांनी हल्ला केलाय( Indian origin Hyderabad student was robbed by armed men)
 Indian origin Hyderabad student was robbed by armed men
Indian origin Hyderabad student was robbed by armed men
Updated on

नवी दिल्ली- अमेरिकेत भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. हैद्राबादचा रहिवाशी असलेल्या विद्यार्थ्यावर चार शस्त्रधारी हल्लेखोरांनी हल्ला केलाय. सय्यद मझाहीर असं विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्या कुटुंबियांनी भारत सरकारला यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली असून याप्रकरणी विद्यार्थ्याला वैद्यकीय मदत मिळावी अशी विनंती सरकारकडे केली आहे.(Indian origin Hyderabad student was robbed by armed men near his apartment in Chicago)

सय्यद हा हैद्राबादचा रहिवाशी आहे. मास्टर डिग्री पूर्ण करण्यासाठी तो चिकागोतील इंडियाना वेसलियन युनिव्हर्सिटीमध्ये आला आहे. चिकागो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 फेब्रुवारी रोजी सशस्त्र दरोडेखोरांनी सय्यदच्या वेस्ट रिज अपार्टमेंटच्या जवळ त्याच्यावर हल्ला केला. यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही लोक एक व्यक्तीचा पाठलाग करताना दिसत आहेत. हल्ल्यानंतर व्हिडिओ करत सय्यदने आपबिती सांगितली आहे. व्हिडिओमध्ये तो रक्तबंबाळ अवस्थेत दिसत आहे.

 Indian origin Hyderabad student was robbed by armed men
Kuwaiti Vessel in Mumbai: कुवेतहून आलेली नौका मुंबईजवळ संशयास्पदरित्या फिरताना आढळली; तिघांची चौकशी सुरु

दरोडेखोरांनी सय्यदचा मोबाईल आणि त्याचे वॉलेट लुटले आहे. सय्यद व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतोय की, 'मी जेवण घेऊन माझ्या घरी परतत होतो. त्यावेळी चार लोकांनी माझा पाठलाग करत माझ्यावर हल्ला केला. त्यांनी माझ्या तोंडावर लाथा मारल्या, डोळ्यांना इजा केली आणि माझा मोबाईल घेऊन ते पळाले. प्लिज मला वाचवा.' हल्ल्यामुळे सय्यदच्या तोंडावर गंभीर जखमा झाल्याचं दिसत आहे.

 Indian origin Hyderabad student was robbed by armed men
Stray Dogs Killed Child : धक्कादायक! वडिलांसोबत झोपडीत झोपलेल्या एक वर्षाच्या बाळावर कुत्र्याचा हल्ला, ओढत नेलं अन्...

सय्यद याचे कुटुंब हैद्राबादमध्ये राहते. पत्नी आणि तीन लहान मुले असे त्याचे कुटुंब आहे. कुटुंबियांनी सय्यदची काळजी व्यक्त केली आहे. सय्यदच्या पत्नीने परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी संपर्क साधला असून अमेरिकेला जाण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, अमेरिकेमध्ये भारतीयांवर हल्ला होण्याच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.