Indian Student In US: आईच्या हाकेला सरकारचा प्रतिसाद, अमेरिकेत भरकटलेल्या विद्यार्थिनीला ग्रीन सिग्नल

Indian Student In US
Indian Student In US
Updated on

Indian Student In US: अमेरिकेतील शिकागो येथे उपासमारीच्या अवस्थेत सापडलेल्या हैदराबादच्या विद्यार्थिनीला भारतीय दूतावासाने मदत केली आहे. भारतीय दूतावासाने ट्विट केले की आम्हाला आनंद आहे की आम्ही सय्यदा झैदीशी संपर्क साधू शकलो. ती एकदम बरी आहे, भारतात तिच्या आईसोबत देखील संपर्क झाला आहे.

"आम्ही विद्यार्थिनीला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत. आम्ही तिला वैद्यकीय मदत देण्याची आणि भारतात जाण्यासाठी मदत करण्याची ऑफर दिली आहे. भारतात परतण्यासाठी आमच्या समर्थनाच्या ऑफरला त्यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.

काय आहे प्रकरण?

हैदराबादचा एक विद्यार्थीनी नुकतीच अमेरिकेतील शिकागोच्या रस्त्यावर भटकताना दिसली होती. मुलीची ही अवस्था पाहून तिच्या आईने तिला भारतात परत आणण्यासाठी सरकारकडे मदतीची विनंती केली होती.

Indian Student In US
Ajit Pawar: '...म्हणून मी आजचा निर्णय घेतलाय', अमित शाहांच्या कार्यक्रमात अजित पवारांचं मोठं वक्तव्य

आईने लिहिले होते पत्र-

आई सैय्यदा वहाज फातिमा यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहून आपल्या मुलीला घरी आणण्यासाठी मदत मागितली होती. भारत राष्ट्र समिती (BRS) नेते खलीकुर रहमान यांच्या ट्विटर पेजवर हे पत्र पोस्ट केले होते. 

हैदराबाद  येथे राहणाऱ्या एका महिलेने सांगितले की, तिची मुलगी सैय्यदा लुलू मिन्हाज झैदी २०२१ मध्ये डेट्रॉईटच्या TRINE विद्यापीठातून एमएस करण्यासाठी अमेरिकेला गेली होती. गेल्या दोन महिन्यांपासून आपण आपल्या मुलीच्या संपर्कात नसल्याचे तिने सांगितले. अलीकडेच शिकागोमध्ये राहणाऱ्या दोन हैदराबादी तरुणांना झैदी उपासमारीचा सामना करत असल्याचे दिसले होते. सैयदा लुलू मिन्हाज झैदी यांच्या सर्व सामानाची चोरी झाली होती. 

Indian Student In US
Indian Student In US: लेक अमेरिकेत रस्त्यावर उपाशी, भारतात आईची धावपळ... एस जयशंकर यांना मदतीचे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.