कोरोनाची भिती; आईनेच पाच वर्षांच्या मुलीला 15 वेळा भोसकलं

कोरोनाची भिती; आईनेच पाच वर्षांच्या मुलीला 15 वेळा भोसकलं
Updated on

दीड वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीच्या भितीखाली जगत आहे. सर्वजण या कठीण परिस्थितीचा अतिशय धैर्याने सामना करत आहेत. पण, काहींच्या मनात कोरोनाची प्रचंड भीती आहे. या भीतीपायीच एका आईने चक्क पोटच्या पोरीची हत्या केल्याचा धक्कादायक आणि हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. ब्रिटनची राजधानी लंडन येथे ही भयावह घटना घडली आहे. भारतीय असणाऱ्या महिलेने कोरोनाच्या भितीपायी आपल्या पाच वर्षांच्या मुलीला चाकूनं 15 वेळा भोसकल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

मुलाचा खून केल्याप्रकरणी 36 वर्षीय सुथा शिवनाथम हिला पोलिसांनी अटक केली असून सध्या लंडनमधील न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान असं समोर आलं की, सुथा शिवनाथमनं आपल्याच मुलीची चाकूनं भोसकून हत्या केली, कारण तिला भीती होती, की आपला कोरोनानं मृत्यू होणार आहे आणि यानंतर मुलगी तिच्याशिवाय राहू शकणार नाही. मुलीवर चाकूने 15 वेळा वार केल्यानंतर सुथाने स्वत:वर वार केले. दोघींनाही जखमी अवस्थेत शेजाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केलं होतं. डॉक्टरांनी मुलीला मृत घोषीत केलं.

कोरोनाची भिती; आईनेच पाच वर्षांच्या मुलीला 15 वेळा भोसकलं
डेल्टा+ चा 11 राज्यात प्रसार; महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

न्यायालयातील सुनावणीदरम्यान मुलीचे वडील सुगंथन शिवनाथम यांनी सांगितलं की, कोरोना महामारी आणि निर्बंधांचं पत्नीवर अतिशय वाईट परिणाम झाला होता. तिला सतत कोरोना होतो की काय? असं वाटत होतं. कोरोनाची भीती, सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊन या भयंकर परिस्थितीचा सुथावर परिणाम झाला आणि आपल्याला कोरोना होऊन दगावू या भीतीपायी हे कृत्य केल्याचं सुगंथन याने कोर्टात सांगितलं.

कोरोनाची भिती; आईनेच पाच वर्षांच्या मुलीला 15 वेळा भोसकलं
पाकिस्तानला मोठा धक्का; ‘ग्रे लिस्ट’मधील समावेश कायम

सुथा शिवनाथम आणि सुगंथन यांचं 2006 मध्ये लग्न झालं होतं. त्यानंतर शिवनाथम कुटुंब लंडनमध्ये शिफ्ट झालं. सुथा शिवनाथमवर उपचार करणाऱ्या मनोरुग्ण चिकित्सकानं सांगितलं की, महामारी आणि लॉकडाऊन आणि निर्बंधाचा सुथावर मानसिक परिणाम झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.