India–Russia relations : युद्ध करण्याची ही वेळ नाही;मोदींकडून पुनरुच्चार,ऑस्ट्रियाबरोबर द्विपक्षीय चर्चा

रशियामध्ये अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रियामध्ये येत चॅन्सलर कार्ल नेहॅमर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. विविध मुद्द्यांवर संवाद साधतानाच मोदी आणि नेहॅमर यांनी जगभरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या संघर्षांबाबतही चर्चा केली.
India–Russia relations
India–Russia relations sakal
Updated on

व्हीएन्ना : रशियामध्ये अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रियामध्ये येत चॅन्सलर कार्ल नेहॅमर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. विविध मुद्द्यांवर संवाद साधतानाच मोदी आणि नेहॅमर यांनी जगभरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या संघर्षांबाबतही चर्चा केली. युद्ध करण्याची ही वेळ नसल्याचे मोदी यांनी नेहॅमर यांना सांगत भारताची भूमिका स्पष्ट केली. युक्रेन-रशिया युद्धासंदर्भात पुतीन यांच्याशी मागे एकदा बोलतानाही मोदी यांनी हेच प्रतिपादन केले होते.

ऑस्ट्रियाचा दौरा करणारे मोदी हे मागील चाळीस वर्षांतील भारताचे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. या देशाबरोबर संबंध वाढविण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. मोदी-नेहॅमर यांच्यातील भेटीत विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. तसेच, आगामी काही वर्षांत सहकार्य वाढविण्यासाठीचा आराखडाही तयार करण्यात आला आहे, अशी माहिती मोदींनी दिली. ‘‘नेहॅमर यांच्याबरोबर आज अत्यंत उपयुक्त चर्चा झाली. दोन देशांमधील संबंध दृढ करण्याबाबत आम्ही आराखडाही तयार केला आहे,’’ असे मोदींनी चर्चेनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. जगभरात सुरू असलेल्या संघर्षाबाबतही आम्ही एकमेकांचे मत जाणून घेतले. हा काळ युद्ध करण्याचा नाही, असे मी पूर्वीही सांगितले होते आणि आजही सांगितले, असेही मोदींनी स्पष्ट केले. मोदी आणि नेहॅमर या दोघांनी दहशतवादी कृत्यांचा निषेध केला. संयुक्त राष्ट्रांच्या आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांच्या रचनेत सुधारणा व्हावी, याबाबतही दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.

भारताची भूमिका मोलाची

ऑस्ट्रियाचे चॅन्सलर कार्ल नेहॅमर यांनी भारताचे कौतुक केले. ‘भारत हा प्रभावशाली देश असून रशिया-युक्रेन युद्धात शांतता निर्माण करण्यासाठी या देशाची भूमिका अत्यंत मोलाची आहे,’ असे नेहॅमर म्हणाले. ‘‘युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाबाबत आम्ही सविस्तर चर्चा केली. या युद्धाबाबतचे भारताचे मत जाणून घेणे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. भारत समजून घेण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे,’’ असेही नेहॅमर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.