संयुक्त राष्ट्र: भारतातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर (Indias Covid situation) जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी चिंता व्यक्त केली आहे. "भारतात कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली स्थिती चिंताजनक आहे. अनेक राज्यांमध्ये रुग्णावाढ होत आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढत आहे" असे ट्रेडोस अधनोम घेब्रेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) म्हणाले. कोरोना व्हायरसच्या साथीचं दुसर वर्ष पहिल्या वर्षापेक्षा जास्त धोकादायक ठरेल असं मत घेब्रेसस यांनी व्यक्त केलं. (Indias Covid situation hugely concerning WHO Chief)
भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, WHO कडूनही मदतीचा हात देण्यात आला आहे. हजारो ऑक्सिजन कॉनसनट्रेटर्स, मोबाइल फिल्ड हॉस्पिटलसाठी तंबू, मास्क आणि अन्य वैद्यकीय साहित्य भारतात पाठवण्यात आले आहे, असे ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी सांगितले.
"भारतातील कोरोना स्थिती चिंताजनक आहे. अनेक राज्यांमध्ये भीती वाटावी अशा पद्धतीने रुग्णवाढ होतेय. रुग्णालयात दाखल होण्याचे, मृत्यूचे प्रमाण वाढतेय" असे ट्रेडोस अधनोम घेब्रेसस पत्रकार परिषदेत म्हणाले. देशात कोरोनाच्या (India Corona Update) दुसऱ्या लाटेनं कहर केला आहे.
दरदिवशी तीन लाखांहून अधिक रुग्ण आणि चार हजारांहून जास्त मृत्यू होत आहेत. मात्र गेल्या दोन दिवसात सलग कोरोनामुक्तांची (Discharge Patient) संख्या नव्या रुग्णांपेक्षा जास्त आहे. शुक्रवारी भारतात 3 लाख 26 हजार 98 नवीन रुग्ण सापडले. तर 3 लाख 53 हजार 299 जण कोरोनामुक्त झाले. तर गेल्या 24 तासात 3 हजार 890 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत भारतात एकूण 2 कोटी 43 लाख 72 हजार 907 जणांना कोरोनाची लागण झाली असून 2 कोटी 4 लाख 32 हजार 898 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 2 लाख 66 हजार 207 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. सध्या देशात 36 लाख 73 हजार 802 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.