९ मार्च रोजी भारताने चुकून डागल्या गेलेल्या क्षेपणास्त्रावरून पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. भारताच्या क्षेपणास्त्रामुळे पाकिस्तान घाबरला असून पाकिस्ताननं आपल्या वायुसेनेचे उपप्रमुख आणि दोन मार्शल यांची हकालपट्टी केली आहे. भारत आमचं काश्मीर गिळंकृत करेल, असे पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त (Former High Commissioner) म्हणाले.
क्षेपणास्त्राच्या मुद्द्यावरून पाकिस्तानमध्ये तणाव वाढला-
पाकिस्तानमधील राजकीय वातावरण चांगलंच तापले असताना ही घटना घडली आहे. या घटनेनंतर इम्रान सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे. दरम्यान,भारतातून सुटलेल्या या क्षेपणास्त्राला वेळेत डिटेक्ट न केल्याने पाकिस्तानने हवाई दलाचे उपप्रमुख आणि दोन एअर मार्शल यांना बडतर्फ केल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे. (India Accidentally Fires a Missile at Pakistan, Deputy Chief of Air Staff and 2nd Marshal Dismissed)
क्षेपणास्त्र पाकिस्तानमध्ये १२४ किमीपर्यंत आत पोहोचले होते-
पाकिस्तानच्या दिशेने चुकून डागलेल्या क्षेपणास्त्राबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आज (मंगळवारी) संसदेत निवेदन देणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हत्यारांशिवाय असलेलं हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र गेल्या बुधवारी पाकिस्तानच्या 124 किमी आत पोहोचले. संरक्षण मंत्रालयाने तांत्रिक दोषामुळे ही घटना असल्याचे म्हटले होते.
शाह मेहमूद कुरेशी यांनी केली ही मागणी-
दुसरीकडे, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी म्हणाले की, भारताकडून क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानी हद्दीत पडणे ही एक गंभीर बाब आहे, जी भारताच्या बाजूने दिलेल्या केवळ वरवरच्या स्पष्टीकरणाने सोडवता येणार नाही. या प्रकरणाची संयुक्त चौकशी करण्याच्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.
भारताने याबद्दल खेद व्यक्त केला असल्याचं आणि क्षेपणास्त्र 'चुकून पडल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, पाकिस्तानने संयुक्त चौकशीची मागणी केली आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला या घटनेची सखोल दखल घेण्याचे आणि प्रदेशात सामरिक स्थिरतेसंदर्भात योग्य भूमिका बजावण्याचे आवाहन केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.