UPI Payment In France: आता फ्रान्समध्येही करता येणार UPI पेमेंट, आयफेल टॉवर पासून होणार सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर असून या दोन दिवसीय दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी मोठी बातमी समोर आली आहे.
UPI Payment In France
UPI Payment In FranceSakal
Updated on

UPI Payment In France: पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर असून या दोन दिवसीय दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी मोठी बातमी समोर आली आहे. खरं तर, पीएम मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीनंतर दोन्ही देशांमध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI बाबत करार झाला आहे. यानंतर, आता फ्रान्समध्ये देखील UPI वापरता येणार आहे.

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये गुरुवारी भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, लवकरच भारतीय पर्यटक आयफेल टॉवरवरही UPI पेमेंट करू शकतील.

पंतप्रधानांनी सांगितले की, फ्रान्समध्ये UPI द्वारे पेमेंट करण्याचा करार करण्यात आला आहे, त्याची सुरुवात आयफेल टॉवरपासून होईल. ते म्हणाले की, भारतीय लोक यूपीआयच्या माध्यमातून रुपयात पैसे भरू शकतील. या करारामुळे भारतासाठी नवी बाजारपेठ उघडेल.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पॅरिसमधील ला सीन म्युझिकलमध्ये भारतीय लाेकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताचा यूपीआय असो किंवा इतर डिजिटल प्लॅटफॉर्म, त्यांनी देशात मोठा सामाजिक बदल घडवून आणला आहे.

UPI Payment In France
PM Modi France Visit: फ्रान्समध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! PM मोदींनी केली 'ही' मोठी घोषणा

मला आनंद आहे की भारत आणि फ्रान्स या दिशेने एकत्र काम करत आहेत. गेल्या वर्षी 2022 मध्ये, UPI सेवा प्रदान करणारी आघाडीची संस्था, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने फ्रान्सच्या ऑनलाइन पेमेंट सिस्टम 'Lyra' सोबत एक सामंजस्य करार केला होता.

भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन

गुरुवारी भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, भारताला विकसनशील देश बनवायचे असेल तर तुम्ही देशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली पाहिजे.

UPI Payment In France
Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()