जाकार्ता : इंडोनेशियाची (Indonesia) राजधानी जकार्ता (Jakarta) समुद्राखाली बुडण्याचा धोका लक्षात घेऊन येथील सरकारने दूरदृष्टी ठेवून राजधानी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नुसानताराला (Nusantara) राजधानीचा दर्जा देणारा कायदा संसदेत मंजूर झाला आहे.
भविष्यातील इंडोनेशिया लक्षात ठेऊन राजधानी बदलण्याचा निर्णय घेतला असून जाकार्ताऐवजी नुसानताराची निवड केली असल्याची माहिती इंडोनेशियाच्या सरकारने एका निवेदनातून दिली आहे. राजधानीचे प्रारंभिक स्थलांतर २०२२ ते २०२४ या काळात सुरू होईल. पुढील दशकात सरकारचे मुख्य केंद्र बदलेल आणि २०४५ पर्यंत ‘वर्ल्ड सिटी ऑफ ऑल’ (सर्वांसाठी जागतिक शहर) दृष्टीस पडेल, असा दावा सरकारने केला आहे. नव्या राजधानी कायद्यामुळे इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांच्या महत्त्वाकांक्षी ३२ अब्ज डॉलरच्या महाप्रकल्पाला कायदेशीर पाठबळ मिळाल्याचे समजले जात आहे.
राजधानी स्थलांतरणाची 'ही' आहेत कारणे
- जकार्ता हे समुद्राजवळील दलदलीच्या जमिनीवर वसलेले शहर
-सध्याच्या जागतिक हवामान बदलाच्या काळात पुरात बुडण्याचा सर्वाधिक धोका
- भूजलाच्या बेसुमार उपशामुळे जावा समुद्रात वेगाने खचत आहे
- हवेचे प्रदूषण व अतिशय गर्दी याही समस्या तीव्र
अशी झाली नुसानताराची निवड
- प्रादेशिक लाभ व फायदे
- द्वीपसमूहाच्या मध्यभागी नवे आर्थिक केंद्रस्थान निर्माण करणे
- अध्यक्ष विडोडो यांनी या शहराची निवड केली
- इंडोनेशियन भाषेत ‘नुसानतारा’चा अर्थ ‘द्विपसमूह’ असा होतो
- नव्या राजधानीचे क्षेत्र दोन हजार ५६१ चौरस किलोमीटर एवढे आहे. बहुतेक भूभाग हा जंगलाने व्यापला आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.