Pakistan Inflation: पाकिस्तानमध्ये महागाईचा विक्रम; महागाईचा दर 35 टक्क्यांच्या पुढे, रमजानमध्ये...

आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये मूलभूत गरजेच्या प्रत्येक वस्तू महाग झाल्या आहेत.
Pakistan Inflation
Pakistan InflationSakal
Updated on

Pakistan Inflation: पाकिस्तान स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांच्या सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. देशाच्या महागाई दराने सर्व विक्रम मोडले आहेत. ब्लूमबर्गने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, पाकिस्तानच्या सांख्यिकी ब्यूरो (PBS) ने शनिवारी नवीन महागाईची आकडेवारी जाहीर करताना सांगितले की, मार्च महिन्यात देशाचा ग्राहक किंमत निर्देशांक 35.37 टक्क्यांवर पोहोचला आहे.

पाकिस्तानचा मार्च महिन्यातील महागाई दर वार्षिक आधारावर सर्वाधिक आहे. ब्लूमबर्गने आपल्या सर्वेक्षणात मार्चमध्ये देशातील महागाई दर 34.8 टक्के राहण्याची शक्यता वर्तवली होती.

अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या महागाईचे आकडे अपेक्षेपेक्षा जास्त नोंदवले गेले आहेत. दुसरीकडे, फेब्रुवारीचा महागाईचा दर 31.55 टक्के होता. (Inflation At 50-Year High In Crisis Hit Pakistan)

पाकिस्तानात महागाई का वाढत आहे?

पाकिस्तानातील सर्वसामान्य जनता महागाईने हैराण झाली आहे. रमजान महिन्यात वाढत्या महागाईने लोकांचे बजेट बिघडले आहे. महागाई वाढण्यामागचे मुख्य कारण म्हणजे आयएमएफचे मदत पॅकेज मिळविण्यासाठी सरकारने गेल्या काही महिन्यांत करात वाढ केली आहे.

यासोबतच देशातील इंधनाच्या दरातही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. अशा स्थितीत त्याचा परिणाम खाद्यपदार्थांच्या किंमतीवर स्पष्टपणे दिसून येत आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये पाकिस्तानच्या चलनवाढीचा दर 12.72 टक्के होता, तो आता 35.37 टक्के झाला आहे. अशा स्थितीत देशात अवघ्या एका वर्षात महागाईत जवळपास 3 पट वाढ नोंदवण्यात आली आहे.

महागाईपासून दिलासा मिळणार का?

आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये मूलभूत गरजेच्या प्रत्येक वस्तू महाग झाल्या आहेत. देशातील वाहतूक 54.94 टक्क्यांनी महाग झाली आहे. त्याचबरोबर देशातील खाद्यपदार्थांच्या किंमतीत 47.15 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Pakistan Inflation
Indian Rupee: भारतीय रुपयाचा दबदबा, रशियानंतर आता 'या' देशासोबत करणार रुपयात व्यवहार

त्याचबरोबर कपडे आणि बुटांच्या किंमती 21.93 टक्क्यांनी वाढल्या असून घर, पाणी, वीज यासारख्या मूलभूत गोष्टींच्या किंमती 17.49 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

विशेष म्हणजे, शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आर्थिक अपडेट आणि आउटलुकमध्ये असे म्हटले आहे की आगामी काळात महागाई आणखी वाढू शकते.

याचे सर्वात मोठे कारण म्हणजे इंधनाच्या दरात झालेली वाढ आणि मध्यवर्ती बँकेची धोरणे. या महिन्यात ईदचा सण साजरा केला जात आहे. अशा परिस्थितीत महागाईमुळे जनता चिंतेत आहे.

Pakistan Inflation
शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.