अमेरिका, ब्रिटनला महागाई दराचे चटके

हवाई प्रवास महागला : युक्रेन-रशिया युद्धाला धरले जबाबदार
Inflation
Inflation Sakal
Updated on

नवी दिल्ली - भारतातच नाही तर अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांनाही महागाईच्या दराने त्रस्त केले आहे. भारतात एप्रिल महिन्यांत किरकोळ महागाईचा दर ७ टक्क्यांवर पोचला. मार्च महिन्यांत हाच दर ६.९५ टक्के होता. पुढील महिन्यांत म्हणजेच जून महिन्यांत आरबीआयकडून रेपो रेटमध्ये वाढ होण्याची शक्यता अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे महागाई आणखी वाढेल, अशी शक्यता आहे. अमेरिका, ब्रिटनसारख्या श्रीमंत देशांना देखील महागाईची झळ बसत आहे.

ब्रिटनमध्ये महागाईचा दर एप्रिल महिन्यांत ९ टक्क्यांवर पोचला आहे. हा दर १९८२ नंतर सर्वाधिक आहे. वाढत्या महागाईमुळे ब्रिटनचे लोक हैराण झाले आहेत. युरोपातील सर्वात मोठ्या पाच अर्थव्यवस्थेत ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचा समावेश आहे. परंतु तेथे महागाईची झळ बसत असून अर्थमंत्री ऋषी सुनक महागाईची झळ कमी करण्यासाठी प्रयत्न करात आहेत.

ते म्हणाले, की आम्ही नागरिकांना जागतिक आव्हानांपासून पूर्णपणे वाचवू शकत नाही. परंतु त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. महागाई कमी करण्यासाठी आवश्‍यक पावले उचलण्यासाठी तयार आहोत, असे त्यांनी नमूद केले. ब्रिटनमध्ये महागाई भडकण्यामागे कच्चे तेलाचे कारण सांगितले जात आहे. युक्रेनवरील हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे केवळ ब्रिटन आणि भारतच नाही तर जगभरातील पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. ब्रिटनमध्ये भाजीपाला, अन्नधान्याच्या किमती वाढल्या आहेत.

अमेरिकेत महागाईचा दर ८.३ टक्के

अमेरिकेत गेल्या महिन्यांत महागाईचा दर ८.३ टक्के राहिला आहे. परंतु मार्च महिन्याच्या ८.५ टक्क्यांच्या तुलनेत हा दर कमी आहे. तरीही अमेरिकेत गेल्या चार दशकात प्रथमच महागाईच्या दराने उच्चांक गाठला आहे. अमेरिकेत खाण्यापिण्याच्या गोष्टींबरोबरच विमानाचे तिकीट, गाड्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. अमेरिकेत विमानाचे तिकीट १९ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या तीन महिन्यात हवाई प्रवासाचे तिकीट ३५ टक्क्यांनी महाग झाले आहे. मार्च महिन्यांच्या तुलनेत गॅसच्या किमतीत ६ टक्के घसरण झाली आहे. परंतु ही किंमत मागील काही वर्षाच्या तुलनेत अधिकच आहे. अमेरिकेच्या महागाईला रशियाला जबाबदार धरले जात आहे. युक्रेनवरील हल्ल्यानंतर जगभरात धातूच्या किमतीतही वाढ झाली आहे.

पाकिस्तानात १३. ४ टक्के महागाई

युरोपातील अन्य देशांतील महागाई दराचा विचार केल्यास जर्मनीत ७.४ टक्के, स्पेनमध्ये ८.४ टक्के महागाईचा दर आहे. जर्मनीत १९८१ नंतर प्रथमच महागाईचे चटके बसत आहेत. पाकिस्तानमध्ये एप्रिल महिन्यांत किरकोळ महागाईचा दर १३.४ टक्के राहिला आहे. एका महिन्यापूर्वी तेथे १२.७ टक्के महागाईचा दर होता. अन्य देशांच्या तुलनेत पाकिस्तानात महागाईचा दर सर्वाधिक आहे. पाकिस्तानची स्थिती बिकट बनली आहे. श्रीलंकेतील महागाईचा दर देखील आवाक्याबाहेर गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.