पाकिस्तानला महागाईच्या झळा! गॅस, तूप आणि मटणाचे दर गगनाला

Pakistan
Pakistanesakal
Updated on
Summary

पाकिस्तान तुपाची किंमत 15 रुपयांनी वाढून 49 रुपये प्रति किलो झालीय.

इस्लामाबाद : पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या (PBS) साप्ताहिक अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये महागाई 12.66 टक्क्यांनी वाढलीय, तर गेल्या आठवड्यात महागाईचा दर 0.2 टक्के नोंदला गेलाय. यामुळे टोमॅटो, बटाटे आणि तुपाचे भाव गगनाला भिडलेत. जिओ न्यूजच्या अहवालानुसार ब्यूरोनं अहवालात म्हटलंय, की गेल्या आठवड्यात वाढत्या महागाईमुळे टोमॅटो, बटाटे, तूप, मटण आणि गॅस (LPG) सिलेंडरसह 22 वस्तू अधिक महाग झाल्या आहेत.

साप्ताहिक अहवालानुसार, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती 43.96 रुपये प्रति किलो, तुपाचे दर 2.99 रुपये प्रति किलोने वाढले आहेत, तर मटणाच्या किमतीत 4.58 रुपयांनी वाढ झालीय. दरम्यान, स्टोअर्समध्ये विविध वस्तूंच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत. 14 रुपयांच्या दरवाढीनंतर खाद्य तेलाची किंमत 110 रुपये प्रति लीटरवर पोहोचलीय.

Pakistan
वाढता वाढता वाढे! आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ

जिओ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपूर्वी तुपाची किंमत 400 ते 450 रुपये अशी होती. आता ती 15 रुपयांनी वाढून 49 रुपये प्रति किलो झालीय. त्यामुळे पाकिस्तानात तूप 500 रुपयांच्या घरात पोहोल्याचे समजते. दोन किलो वॉशिंग पावडरची किंमतही 10 रुपयांवरून 21 रुपये करण्यात आलीय, तर 100 ग्रॅम बॉडी लोशनच्या किमतीत 20 रुपयांनी वाढ करण्यात आलीय. संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं, की खुल्या बाजारात किंमती वाढल्याने युटिलिटी स्टोअर्सवरही परिणाम झालाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()