इन्फोसिसचा मोठा निर्णण; रशियातील सर्व कार्यालये करणार बंद

  Infosys
Infosys
Updated on

आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिस रशियातील आपली सर्व कार्यालये बंद करणार असल्याचे बोलले जात आहे. ब्रिटीश मीडियाने कंपनीचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक यांच्यावर व्लादिमीर पुतिन यांच्या राजवटीत नफेखोरी केल्याचा आरोप केला आहे. ऋषी हे यूकेचे चॅन्सेलर ऑफ द एक्स्चेकर आहेत. बीबीसीने सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की, इन्फोसिसने मॉस्कोमधील आपल्या कर्मचाऱ्यांना इतरत्र काम शोधण्यास सांगितले आहे.

यापूर्वी इन्फोसिसने स्थानिक उद्योगांशी कोणतेही सक्रिय व्यावसायिक संबंध असल्याचा नकार दिला होता आणि युक्रेनमधील युद्धातील पीडितांना मदत म्हणून कंपनीने $1 मिलियन देण्याचे कबूल केले होते.

ऋषी सुनक यांचा विवाह नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीशी झाला आहे. अक्षता मूर्ती यांचे इन्फोसिसमध्ये 400 मिलीयन पौंडांपेक्षा जास्त शेअर्स असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ऋषी सुनक यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. अक्षता मूर्ती यांच्याकडे इन्फोसिसमध्ये 0.9 % पेक्षा जास्त हिस्सा असल्याचा अंदाज आहे. ऋषी सनच्या प्रवक्त्याने यापूर्वी म्हटले आहे की त्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा कंपनीच्या कामकाजाच्या निर्णयांमध्ये कोणताही सहभाग नाही.

  Infosys
OnePlus 10 Pro 5G स्मार्टफोन अखेर भारतात लॉंच; वाचा किंमत-फीचर्स

सुमारे 50 देशांमध्ये कामकाज असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक, इन्फोसिसने 2016 मध्ये मॉस्कोमध्ये एक इंजिनियरीं केंद्र स्थापन केले. तेथे 100 लोक काम करतात, असे सांगितले जात आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अनेक आयटी कंपन्यांनी देशातील त्यांचे कामकाज स्थगित केले. पण इन्फोसिसने सांगितले होते की त्यांची एक छोटी टीम तिथे काम करत आहे. सुनक आणि अक्षता मूर्ती यांची स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये बिझनेस पदवी दरम्यान भेट झाली. त्यांनी 2009 मध्ये लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत.

  Infosys
रशिया तुमच्या मदतीला धावून येईल ही अपेक्षा ठेवू नका, अमेरिकेचा भारताला इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.